रशिया। रशियात सुरू असलेल्या 21व्या फिफा विश्वचषकात आज क गटातील दुसरा सामना पेरू विरूद्ध डेन्मार्क असा होणार आहे. पहिल्या सामन्यात फ्रांसने ऑस्ट्रेलियाला 2-1 असे पराभूत केले.
तब्बल 36 वर्षांनंतर पेरू विश्वचषकात पुनरागमन करत आहे. याआधी ते 1930-1954 पर्यंतच्या स्पर्धेत खेळले आहेत.
1982 पासून पेरू फिफा विश्वचषकात खेळलेला नाही. तर दुसरीकडे डेन्मार्क 2014च्या विश्वचषकात नव्हता.
तसेच दोन्ही संघांचा हा पाचवा विश्वचषक आहे.
याआधी झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पेरू दोनदा तर डेन्मार्क एकदा पोहचला आहे. मात्र दोघेही उपांत्यपूर्व फेरी पार करू शकले नाही.
डेन्मार्क आणि टोटेनहॅम हॉटस्परचा मिडफिल्डर ख्रिस्टीयन एरिकसनने याने विश्वचषकाच्या पात्रता फेरीत हॅट्ट्रिक करत डेन्मार्कचा फिफा2018 मधील प्रवेश निश्चित केला.
एरिकसनचा हा दुसरा विश्वचषक असून याआधी तो 2010च्या विश्वचषकातील 2 सामने खेळला आहे. आयर्लंडवर 5-1 असा विजय मिळवत ते विश्वचषकाला पात्र ठरले होते.
डेन्मार्क फिफा क्रमवारीत 12व्या स्थानावर आहे. डेन्मार्कने यावर्षीच्या विश्वचषक पात्रता फेरीतील 12 सामन्यांत 22 गोल केले त्यातील 11 गोल एरिकसनने केले.
फिफा क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेल्या पेरूने न्युझीलंडला पात्रता फेरीत 2-0 ने पराभूत करून फिफा2018 मधील प्रवेश निश्चित केला.
पेरू संघाचा कर्णधार पाओलो ग्वेरेरो याने पात्रता फेरीत 5 गोल केले आहेत. डिसेंबरमध्ये तो डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळला होता.
पेरूचा आक्रमक मिडफिल्डर ख्रिस्टन क्यूवाने पात्रता फेरीतील 16 सामन्यात 4 गोल केले. तसेच कोपा अमेरिकेच्या 10 सामन्यात 2 गोल केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–मेस्सीला आज सुनिल छेत्रीच्या पुढे जाण्याची संधी
–फिफा विश्वचषक २०१८: फ्रांसचा ऑस्ट्रेलियावर विजय