रशिया। 21व्या फिफा विश्वचषकातील आजचा दुसरा आणि शेवटचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रशिया विरुद्ध क्रोएशिया असा रंगणार आहे.
सोचीमधील फिश्ट स्टेडीयमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला रात्री 11.30ला सुरूवात होणार आहे.
हे दोन संघ आतापर्यंत तीनदा एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. 2008च्या युरो चषकात ते दोनदा समोरा-समोर खेळले असून ह्या दोन्ही सामन्यात एकही गोल झाला नाही.
तर नोव्हेंबर 2015ला हे दोन संघ तिसऱ्या सामन्यात भिडले होते. हा सामना क्रोएशियाने 3-1 असा जिंकला. मारियो मॅंडझूकिकने या सामन्यात तिसरा विजयी गोल नोंदवला.
यजमान रशिया पहिल्यांदाच उपांत्यपूर्व
सोव्हियत युनीयन पासून वेगळे होऊन यजमान रशिया पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत पोहचत आहे. सोव्हियत युनीयन 1958 आणि 1970च्या दरम्यान झालेल्या फिफा विश्वचषकात सलग चार वेळा उपांत्यपूर्व फेरीत खेळले आहेत.
क्रोएशियाने आतापर्यंत एकदाच उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. 1998च्या विश्वचषकात त्यांनी जर्मनीला हरवून उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रवेश केला होता. या सामन्यात त्यांना फ्रान्सकडून 2-1 असा पराभवाचा सामना करावा लागला.
मागील पाच फिफा स्पर्धेचे यजमानपद ज्या देशांकडे होते ते सगळे उपांत्यपूर्व फेरी पार करून उपांत्य सामन्यात पोहचले आहेत (1990 इटली, 1998 फ्रान्स, 2002 दक्षिण कोरिया, 2006 जर्मनी, 2014 ब्राझिल).
यावर्षीच्या स्पर्धेत क्रोएशियाने 4 सामन्यात 8 गोल केले आहेत. याआधी त्यांनी 2006 आणि 2014 या स्पर्धेतील 6 सामन्यात मिळून 8 गोल केले होते.
यजमानपद म्हणून मिळालेल्या देशांविरूद्ध खेळण्याची क्रोएशियाची ही तिसरी वेळ आहे.
1998ला झालेल्या फ्रान्स विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याना 2-1 असे पराभूत व्हावे लागले. तर दुसरा सामन्यात त्यांना 2014ला ब्राझिलकडून 3-1 असे पराभूत व्हावे लागले.
बाद फेरीत रशियाने स्पेन या बलाढ्य संघाला पेनाल्टी शूट-आऊटमध्ये 4-3 असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
क्रोएशियाला पण डेन्मार्कने बाद फेरीत चांगला लढा दिला. पहिल्या पाच मिनीटांत 1-1 असे बरोबरीत असताना त्यांनी पुढे पेनाल्टी शूट-आऊटमध्ये 3-2 असा चांगला खेळ करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले.
स्टानीस्लाव चेरचेसोव्ह हे 2016 पासून रशियायन संघाचे प्रशिक्षणपद सांभाळत आहेत. डायनामो मॉस्को आणि लेजिया वॅरसॉ या फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक असणाऱ्या चेरचेसोव्ह यांनी रशियाला 2017च्या फिफा कॉन्फिडरेशनमध्ये पोहचवले आहे.
इगोर आकिनफीव्ह आणि फ्योदर स्मोलोव हे रशियाचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. फ्योदर 2017च्या फिफा कॉन्फिडरेशनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध विजयी गोल केला होता.
ऑक्टोबर 2017मध्ये प्रशिक्षक झ्लाटको डॅलीक यांनी क्रोएशियाच्या प्रशिक्षकपदाची सुत्रे स्विकारली.
प्ले-ऑफच्या सामन्यात ग्रीसला 4-1 असे पराभूत करून क्रोएशियाने विश्वचषकात आपले स्थान पक्के केले होते.
मीडफिल्डर लुका मॉडरिक हा क्रोएशियाचा महत्त्वाचा खेळाडू असून त्याने या स्पर्धेतील 4 सामन्यात 2 गोल केले आहेत.
फिफा क्रमवारीत रशिया 70व्या आणि क्रोएशिया 20व्या क्रमांकावर आहेत.
संभावित संघ-
रशिया- इगोर आकिनफीव्ह, मारिया फर्नांडिस, इलिया कुटापोव, सेर्गे इग्नाशेविच, फ्योदर स्मोलोव, रोमन झोबिनिन, दॅलेर कुजिवाव, अलेक्झांडर समेडोव, अलेक्झांडर गोलोविन, डेनिस चेरहेहेव, अर्तेम डीझ्यूबा, फ्योदर कुदरीशॉव
क्रोएशिया- डॅनजेल सुबॅसिक, सिमे व्हर्शलजोको, डेजन लोव्हरेन, डोमोगेज विडा, इवान स्ट्रेंनिक, इवान रकिटिक, मार्सेलो ब्रोजोव्हिक, अँट रेबिक, लुका मॉडरिक, इवान पेरीसिक, मारियो मॅंडझूकिक
महत्त्वाच्या बातम्या:
-भारतीय संघातील हा खेळाडू आहे रैनाचा बॅटिंग गुरू
-केवळ ६ तासात हा विक्रम होऊ शकतो कुलदिप यादवच्या नावावर
-भारत इंग्लंडला तिन्ही मालिकेत धूळ चारणार, पाकिस्तानच्या माजी दिग्गज फलंदाजाची भविष्यवाणी