---Advertisement---

फिफा विश्वचषक: उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी स्वीडन विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार लढत

On: शनिवार, जुलै 7, 2018 6:45 AM
---Advertisement---

रशिया।  फिफा विश्वचषकात तिसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना आज स्वीडन विरुद्ध इंग्लंड असा होणार आहे. या सामन्याला सांयकाळी 7.30 सुरूवात होणार आहे.

या दोन संघाची समोरा-समोर येण्याची ही 25वी वेळ आहे. यातील 8 सामने इंग्लंडने तर 7 सामने स्वीडनने जिंकले असून उर्वरीत 9 सामने अनिर्णित राहिले आहेत.

त्यांच्यात पहिला सामना 21मे 1923ला झाला हाता. या मैत्रीपूर्ण सामन्यात इंग्लंडने स्वीडनला 4-2ने पराभूत केले होते. तर 2012ला ते शेवटी आमने-सामने आले होते. हा सामना स्वीडनने 4-2ने जिंकला होता.

फिफा विश्वचषकात या दोन संघांची एकमेकांविरुद्ध खेळण्याची ही तिसरीच वेळ आहे. विश्वचषक 2002 आणि 2006ला झालेले सामने 1-1 आणि 2-2 असे अनिर्णित राहिले. हे दोन्ही सामने साखळी फेरीतील होते.

इंग्लंडने आज जर स्वीडनला हरवले तर स्वीडन फिफा विश्वचषक आणि युरोपियन चॅम्पियनशीपमध्ये इंग्लंडकडून पराभूत होणारा तिसरा देश बनेल.

याआधी इंग्लंडने याच दोन स्पर्धेत जर्मनी आणि स्वित्झरर्लंड या संघांचा पराभव केला आहे. युरो 2012च्या स्पर्धेत इंग्लंडने स्वीडनला 3-2 असे हरवले होते.

स्वीडन हा आज पाचव्यांदा उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे. (1934, 1938, 1958, 1994) या 4 पैकी 3 स्पर्धेत ते उपांत्य फेरीच्या सामन्यात पोहचले होते.

1934च्या स्पर्धेत ते जर्मनीकडून हरले होते. तर 1958च्या अंतिम फेरीत ते ब्राझिलकडून 5-2 असे पराभूत झाले होते.

1966चा फिफा विश्वचषक विजेता इंग्लंड 2वेळा उपांत्य फेरीच्या सामन्यात पोहचले आहेत.

प्रशिक्षक जॅन्ने अण्डरसन हे 2016च्या युरो चषकापासून स्वीडन संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहे.

इंग्लंडच्या प्रशिक्षकपदाची धूरा गॅरेथ साउथगेट संभाळत आहेत. त्यांनी फ्रान्सला झालेल्या1998 आणि कोरिया/जपानला झालेल्या 2002च्या फिफा विश्वचचषक ते इंग्लंडच्या संघात होते. या दोन्ही स्पर्धेत त्यांनी देशाला उप-उपांत्यपूर्व फेरीत पोहचवले आहे.

सर्वाधिक गोल करणाऱ्यामध्ये इंग्लंडचा हॅरी केन 3 सामन्यात केलेल्या  6 गोलसह पहिल्या क्रमांकावर आहे.

इंग्लंडचा स्ट्रायकर डॅनियल स्टर्रिजने 2018च्या फिफा पात्रता फेरीत स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्याने पात्रता फेरीच्या पाच सामन्यात 3 गोल केले आहेत.

स्वीडनचा फॉरवर्ड झ्लाटन इब्राहिमोविच याच्या निवृत्तीनंतर मार्कस बर्ग हा संघाचा स्टार खेळाडू असून त्याने 2018च्या फिफा पात्रता फेरीत 11 सामन्यात 8 गोल केले आहेत.

तसेच मिडफिल्डर सेबस्टियन लार्सन हा निलंबनामुळे बाहेर होता. तो आज परत संघात खेळणार आहे. तर दुसरीकडे मिकाल लस्टिगला पिवळे कार्ड मिळाल्याने निलंबीत केले आहे.

स्ट्रायकर ओला टूव्हेननने 2018च्या फिफा पात्रता फेरीत शेवटच्या 10 सेकंदात गोल करून संघाचा फिफा विश्वचषकात प्रवेश निश्चित केला. त्याने विश्वचषकात 1 गोल आणि पात्रता फेरीत 3 गोल केले आहे.

आजच्या सामन्यात स्वीडीश खेळाडू स्ट्रायकर केनला गोल करण्यापासून रोखणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

फिफा क्रमवारीत स्वीडन 24व्या आणि इंग्लंड 12व्या क्रमांकावर आहे.

संभावित संघ-

स्वीडन- रॉबिन ऑलसेन, एमिल क्रॉफथ, व्हिक्टर लिंडेलॉफ, अॅन्ड्रॅअस ग्रानक्विस्ट, लुडविग ऑगस्टसिन्सन, व्हिक्टर क्लेससन, सेबास्टियन लार्सन, अल्बिन एकदल, एमिल फोर्सबर्ग, मार्कस बर्ग, ओला टूव्हेनन 

इंग्लंड- जॉर्डन पिकफोर्ड,काईल वॉकर, जॉन स्टोन्स, हॅरी मॅगुइर, कीरॉन थ्रीपियर, डेल, जॉर्डन हेंडरसन, जेसी लिंगर्ड, ऍशली यंग, रहम स्टर्लिंग, हॅरी केन

महत्त्वाच्या बातम्या:

-भारतीय संघातील हा खेळाडू आहे रैनाचा बॅटिंग गुरू

-केवळ ६ तासात हा विक्रम होऊ शकतो कुलदिप यादवच्या नावावर

-भारत इंग्लंडला तिन्ही मालिकेत धूळ चारणार, पाकिस्तानच्या माजी दिग्गज फलंदाजाची भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment