कतार येथे पुरूष फुटबॉल संघाचा 22 वा फिफा विश्वचषक (FIFA World Cup) खेळला जात आहे. 20 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे अंतिम 16 संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये ब्राझील,अर्जेंटिना, पोर्तुगल या प्रसिद्ध संघांचा समावेश आहे. दुसरीकडे चार वेळेचा विश्वविजेता जर्मनी आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला बेल्जियम उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करू शकले नाही. या स्पर्धेत एकूण 32 संघांनी सहभाग नोंदवला. यातील अनेक तगड्या संघांना एकदा तरी पराभवाचा सामना करावा लागला, मात्र पाच संघ असे आहेत ज्यांंनी साखळी फेरीत एकदाही सामना गमावला नाही. ते संघ कोणते आणि सुपर 16मध्ये कोण कोणाशी भिडणार हे जाणून घेऊ.
या हंगामात उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा फ्रांस हा पहिला संघ ठरला. त्यानंतर ब्राझील, पोर्तुगल आणि अर्जेंटिना यांनी प्रवेश केला. याबरोबरच नेदरलॅंड्स, सेनेगल, इंग्लंड, पोलंड, अमेरिका, स्वित्झर्लंड, क्रोएशिया, जपान, मोरोक्को, स्पेन, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांनीही सुपर 16मध्ये प्रवेश केला.
आशियातील तीन संघ बाद फेरीत
या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एएफसी म्हणजेच एशियन फुटबॉल कॉन्फडरेशन, आशियातील तीन संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीत जागा पक्की केली. जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांचा त्यामध्ये समावेश आहे. अमेरिकेनेही बाद फेरीत पोहचत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या स्पर्धेत पहिला धक्का सौदी अरेबियाने दिला. जेव्हा त्यांनी अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव केला होता. तरीही सौदी अरेबिया संघ अंतिम 16मध्ये पोहोचला नाही, कारण त्यांनी सलग दोन सामने गमावले. first time in history of The World Cup, 3 teams from AFC are in Pre Quarter finals
अंतिम फेरीत मेस्सी-रोनाल्डो समोरासमोर?
विश्वचषकात मेस्सी आणि रोनाल्डो कधी एकमेंकांशी भिडणार याची उत्युकता चाहत्यांना आहे. यामुळे समीकरण पाहिले तर अर्जेंटिना आणि पोर्तुगल यांच्यात अंतिम सामना होण्याची शक्यता आहे. समजा, पोर्तुगलने उपउपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडला पराभूत केले तर त्यांचा सामना स्पेन किंवा मोरोक्को यांच्याशी होईल. दुसरीकडे अर्जेंटिनाने देखील ऑस्ट्रेलियाला हरवले तर त्यांचा सामना नेदरलॅंड्स किंवा अमेरिकेशी होईल.
Group stage complete ✅
It's a straight road to the #Qatar2022 Final for these 16 teams!#FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 2, 2022
उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने (वेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार)-
3 डिसेंबर नेदरलॅंड्स वि. अमेरिका (रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी)
4 डिसेंबर, अर्जेंटिना वि. ऑस्ट्रेलिया (रात्री 12.30)
4 डिसेंबर, फ्रांस वि. पोलंड (रात्री 8.30)
5 डिसेंबर, इंग्लंड वि. सेनेगल (रात्री 12.30)
5 डिसेंबर, जपान वि. क्रोएशिया (रात्री 8.30)
6 डिसेंबर, ब्राझील वि. दक्षिण कोरिया (रात्री 12.30)
6 डिसेंबर, मोरोक्को वि. स्पेन ( रात्री 8.30)
7 डिसेंबर, पोर्तुगल वि. स्वित्झर्लंड (रात्री 12.30)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशच्या वनडे मालिकेतून पत्ता कट होताच हळहळला शमी, सोशल मीडियावर झाला व्यक्त
भारतीय क्रिकेटर अन्नापासून वंचित, मलेशियन एअरलाईन्सकडून ‘या’ खेळाडूची गैरसोय