---Advertisement---

अखेर दिओगो मॅरेडोनांची ती शंका खरी ठरली?

---Advertisement---

जगभरातील दोन लाखा पेक्षा जास्त लोकांनी फिफा विश्वचषकात इंग्लंड-कोलंबिया यांच्यातील बाद फेरीचा सामना पुन्हा घ्यावा म्हणुन स्वाक्षरी मोहीमेत सहभाग घेतला आहे.

मंगळवारी(3 जुलै) झालेल्या बाद फेरीच्या इंग्लंड वि. कोलंबिया या सामन्यात पंचानी मोठ्या प्रमाणात सर्व निर्णय इंग्लंडच्या बाजूने दिल्याचा आरोप करत कोलंबियन चाहत्यांनी ही स्वाक्षरी मोहीम राबवत हा सामना पुन्हा घ्यावा अशी मागणी फिफाकडे केली आहे.

यापूर्वी कोलंबियन कर्णधार रॅडमेल फॅलकोने देखील या सामन्यानंतर पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

“या ५०-५० टक्के समान संधी असलेल्या सामन्यात पंचानी प्रत्येक वेळी इंग्लडच्या बाजूने निर्णय दिले. पंच दोन्ही संघांशी समान न्यायाने वागले नाहीत. त्यामुळे आमच्या खेळाडूंची सामना खेळतानाची मानसिकता काय असेल तुम्ही समजू शकता.” असे कोलंबियाचा कर्णधार रॅडमेल फॅलको म्हणाला.

तसेच यापूर्वी अर्जेंटीनाचे महान फुटबॉलपटू दिओगो मॅरेडोना यांनीही या सामन्यातील पंचांच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त केली होती.

यावर मात्र इंग्लंडचा बचावपटू जॉन स्टोन्सने कोलंबियन संघावर जोरदार पलटवार केला आहे.

“मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात असभ्य संघ म्हणजे कोलंबिया. तुम्ही पाहिले असेल की आम्ही ज्यावेळी पेनाल्टी  शूट आऊटवर विजय  मिळवला त्यावेळी त्यांनी घोळका करुन पंचांशी कशी हुज्जत घातली.” जॉन स्टोन्सने या सर्व प्रकारावर बोलताना मत मांडले.

या सर्व प्रकरणावर सर्वात पहिल्यांदा अर्जेंटीनाचे महान फुटबॉलपटू दिओगो मॅरेडोना यांनी आवाज उठवत पंचांच्या निर्णयावर टिका केली होती. पंचांच्या निर्णयावर शंका घेतल्याबद्दल फिफाने दिओगो मॅरेडोनाला असे बिनबुडाचे आरोप न करण्याची ताकीद दिली आहे.

बाद फेरीच्या या सामन्यात विजय मिळवलेल्या इंग्लंडचा उपांत्य पूर्व फेरीचा सामना शनिवारी (७ जुलै) स्वीडनशी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

-विशेष मुलाखत- शिव छत्रपती पुरस्कार मिळाला की कबड्डी कारकीर्दीचं सार्थक झालं असं समजेन- गिरीश इरनक

-विंबल्डनचे चाहते आहात? मग या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात..  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment