---Advertisement---

विश्वचषकातून बाहेर पडलेल्या या संघाचे जगातभरात कौतूक…

---Advertisement---

रशिया।  फिफा विश्वचषकात 2जुलैला झालेल्या बाद फेरीत बेल्जियमने जपानला बाहेरचा रस्ता दाखवला. बाहेर पडलेल्या या संघाच्या खेळाडूंचे जगात सगळीकडे कौतुक होत आहे

त्यांच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूम सोडताना ते नीटनेटके करून तसेच आयोजकांचे आभार व्यक्त करतानाचे पत्रक लिहून ते आपल्या देशाला रवाना झाले. या पत्रकात त्यांनी ‘स्पासिबो’ म्हणजेच मराठीत ‘आभारी आहे’ या रशियन शब्दाचा उपयोग केला.

या सामन्यात जपानचा 3-2 असा पराभव झाला.

जपानने या स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे त्यांनी जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. बाद फेरीत पराभव झाल्यानंतरही त्यांच्या खेळाडूंनी उचलेल्या या पावलामुळे त्यांनी वाहवा मिळवली आहे.

या सामन्यात जपान पूर्वार्धात 2 गोलने आघाडीवर होता. पण उत्तरार्धात बेल्जियमने केलेल्या 3 गोलमुळे त्यांना हार मानावी लागली.

या 21व्या फिफा विश्वचषकात आशियातून जपान बरोबरच इराण, दक्षिण कोरिया, सिरीया आणि सौदी अरेबिया या संघांचा समावेश होता. यापैकी फक्त जपानच बाद फेरीत पोहचल्याने त्यांना आशियातून चांगलीच दाद मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या-

फिफा विश्वचषक: इंग्लंडने विश्वचषकातून कोलंबियाला केले शूट आउट

फिफा विश्वचषक: फिफा विश्वचषकात अनेक खेळाडूंची ठरणार पहिलीच अंतिम फेरीची वारी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment