शनिवार, 30 जूनला झालेल्या फिफा विश्वचषकातील बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्सने लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटीनावर 4-3 अशा गोल फरकाने विजय मिळवत उपांत्य पूर्व फेरी गाठली.
फ्रान्सच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो 19 वर्षीय किलियन एम्बापे. एम्बापे या महत्त्वाच्या सामन्यात दोन गोल करत खऱ्या अर्थाने फ्रान्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
19 वर्षीय किलियन एम्बापेने त्याच्या या कामगिरीने साऱ्या जगाची वाहवा मिळवली. त्यामध्ये एम्बापेची तारीफ करण्यात बॉलिवूडचे शेहनशहा अमिताभ बच्चनही मागे नाहीत.
या सामन्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून युवा एम्बापेचे कौतूक केले.
T 2853 – BUT … what a WC 2018 game .. France vs Argentina !! 4-3 , FRANCE .. a young team and the 19 yr old Mbappé does it for them !! Truly a 'baap' . ..Amazing !!👋👋👋👋
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 30, 2018
“2018 फिफा विश्वचषकातील फ्रान्स वि.अर्जेंटीनी काय सामना होता….फ्रान्सचा युवा संघ आणि 19 वर्षीय एम्बापेने करून दाखवले. एम्बापे खरचं ‘बाप माणूस’ आहे.” या शब्दात अमिताभ बच्चन यांनी एम्बापेवर स्तुतीसुमने उधळली.
या सामन्यात एम्बापेने दोन गोल करून महान फुटबॉलपटू पेले यांच्याशी सर्वात कमी वयात फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीच्या सामन्यात दोन गोल करण्याची बरोबरी साधली.
एकूणच 2018 फिफा विश्वचषकात युवा फ्रान्स संघ आणि किलियन एम्बापेने त्याच्या प्रभावी कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे.
एम्बापेने गट फेरीच्या तीन सामन्याच एक आणि अर्जेंटीना विरुद्धच्या बाद फेरीच्या सामन्यात दोन गोल करत फ्रान्सला उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवून दिले.
फ्रान्सचा उपांत्य पूर्व फेरीचा सामना शुक्रवार, 6 जुलैला उराग्वे विरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे रौप्यपदक; पेनल्टी शुटआऊटमध्ये आॅस्ट्रेलियाने मारली…
-टीम इंडियामध्येही दिसणार पंड्या ब्रदर्स