मॉस्को। रशियात सुरू असलेल्या 21वा फिफा विश्वचषक ‘डोपिंग फ्री’ आहे असा अहवाल फिफाने दिला आहे.
फिफा कॉन्फिडरेशन आणि नॅशनल अॅंटी डोपिंग यांच्या देखरेखीखाली जानेवारी ते जून 2018पासून 3985 नमुन्यांच्या 2,037 चाचण्या घेण्यात आल्या.
यातील 2,761 नमूने स्वत: फिफाने गोळा केले होते. 626 नमूने सामने खेळताना तर 108 सामना न खेळल्या दिवशीही गोळा करण्यात आले.
ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर जे नमूने डोपिंग चाचणी करण्यासाठी घेतले होते त्या सगळ्यांचा निकाल नेगेटिव्ह आला आहे.
गोळा केलेल्या या नमुन्यांची चाचणी स्वित्झर्लंड मधील लुसानेतील लॅबोरेटरीमध्ये करण्यात आल्या.
तसेच फिफा विश्वचषकासाठी जे संघ पात्र झाले त्यानंतर फिफाने डोपिंगसाठी टेस्ट डिस्ट्रिब्युशन प्लान(टीडीपी) ही नवीन योजना आखली होती. यातील जे निकाल येतील ते वर्ल्ड अटी डोपिंग एजेन्सी (वाडा)यांच्या मदतीने तपासले गेले.
1994 नंतर कोणताही खेळाडू डोपिंग चाचणीत दोषी आढळला नाही
यात विश्वचषकास पात्र आणि अपात्र ठरलेल्या संघातील सुमारे 1500 खेळाडूंची डोपिंग चाचणी घेण्यात आली.
ठरलेल्या गटामधील चार संघातील प्रत्येक खेळांडूची सरासरी 4.41 वेळा तरी चाचणी झाली आहे. तर काही जणांची आठ वेळा तपासणी करण्यात आली.
हे तपासलेले नमुने दहा वर्षांसाठी जतन करून ठेवले जाणार आहेत. भविष्यात यांची परत तपासणी केली जाईल.
अर्जेंटीनाचा माजी स्टार खेळाडू दिएगो मॅरेडोना हा 1994च्या डोपिंग चाचणीत दोषी आढळला होता. त्यानंतर अशी कोणतीच बाब समोर आली नाही.
तसेच 2017 मध्ये पेरूचा कर्णधार पाओलो ग्वेरेरो हा या चाचणीत दोषी आढळला होता. त्याच्या रक्तात कोकेनचे काही घटक आढळले पण त्याला स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या:
-म्हणुन धोनी आहेत जगातील सर्वात हुशार क्रिकेटर…
-असाही एक विक्रम जो भारत इंग्लंड दुसऱ्या वनडेत टाॅसवेळी झाला
-काय सांगता! दक्षिण आफ्रिका ७३ धावांवर आॅल आऊट!