रशिया। फिफा विश्वचषकातून स्पेन बाहेर पडल्याने पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत नवे चेहरे दिसत आहेत. यांमधील किमान एक संघ मागील अर्ध्या शतकापासून विश्वचषक जिंकण्याच्या शर्यतीतच नव्हते.
माजी विजेता इंग्लंडने एकदाच अंतिम सामना खेळला आहे. ते ही जेव्हा ते 1966चा फिफा विश्वचषक जिंकले होते. स्वीडन हा तर 1958ला घरच्याच मैदानावर खेळताना ब्राझिलकडून अंतिम फेरीत हरला होता.
या दोन संघांचा बाद फेरीतील सामना स्वीडन विरूद्ध स्वित्झर्लंड आणि कोलंबिया विरूद्ध इंग्लंड असा आहे.
2010ला स्वीडनने यजमान पद गमावले होते. तसेच 2010 आणि 2014च्या फिफा विश्वचषकास ते पात्रही ठरले नाही.
बुकमेकर विलियम हिलनुसार, ऑड्स बेटींगमध्ये इंग्लंड 6-1 अशाने रशियाला (5-1) मागे टाकत फ्रान्स (7-2) आणि ब्राझिल (4-1) नंतर तिसरा आवडता संघ आहे.
रशिया जर उपांत्य सामन्यात पोहचला तर तो सोव्हियत युनियननंतर दुसरा रशियन संघ ठरेल. सोव्हियत युनियन 1966च्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात जर्मनीकडून 2-1ने पराभूत झाला होता.
स्वित्झर्लंडने 1954ला शेवटच्या आठ संघामध्ये स्थान मिळवले होते. त्यांचा सामना 3 जुलैला स्वीडन विरूद्ध आहे.
कोलंबिया 2014च्या विश्वचषकात उप-उपांत्यपूर्व फेरीत चांगला खेळला होता. यामध्ये त्यांना यजमान ब्राझिल कडून 2-1ने हरला.
आज स्वीडन विरूद्ध स्वित्झर्लंड आणि कोलंबिया विरूद्ध इंग्लंड या सामन्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचे आणखी दोन नवीन संघ मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या-
–पांढरी दाढी ठेवून खेळणार पुढचा फिफा विश्वचषक- सर्जियो रॅमोस
–फिफा विश्वचषक: मेस्सी चाहत्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच