लंडन। जगात सगळेच आतूरतेने वाट बघण्याऱ्या 21व्या फिफा विश्वचषकाला रशियात 14 जूनला रशिया विरूद्ध सौदी अरब या सामन्याने सुरूवात झाली.
32 संघांनी यात सहभाग घेतला असून त्यांचे चाहते संघांना वेगवेगळ्या प्रकारे पाठिंबा देत आहेत.
यातच युनाइटेड किंग्डमच्या एका चाहत्याने आंनद साजरा करण्यासाठी या 32 संघाच्या देशातून 32 प्रकारच्या बियर गोळा केल्या आहेत. या चाहत्याने फुटबॉलवरील त्याचे हे प्रेम वेगळ्याच प्रकारे दर्शविले आहे.
गस हुल्ली असे या अवलियाचे नाव आहे. तो चेल्टेनहॅम या शहरातला आहे. या बियर त्याने कशाप्रकारे गोळा केल्या हे त्याने सांगितले.
A football fan, Gus Hully, Displays Beers From 32 Countries Participating At The World Cup. @Gidi_Traffic pic.twitter.com/raGkbYBR3U
— Kelechi↗️ (@iamfatdon) June 15, 2018
स्पेन, जर्मनी आणि फ्रांस यासारख्या देशांमधून बियर गोळा करायला सोपे गेले. मात्र इराण आणि सौदी अरब मध्ये थोड्या अडचणी आल्या पण नंतर त्या पार पडल्या असे त्याने सांगितले.
“सौदी अरबमध्ये बीयर गोळा करण्यात तेथिल एका रहिवासाने मदत केली”,असे गस म्हणाला.
“पनामामधील बीयर तुम्ही बाहेर नाही घेऊन जाऊ शकत. पण नशिबाने माझा एक मित्र त्यावेळी तेथे होता. त्यानेच ही बियर मला आणून दिली”, असेही तो पुढे म्हणाला.
https://twitter.com/umelocj/status/1007440882315005952
गुसने बीयरसोबतचे फोटोजही सोशल मिडीयावर शेयर केले असून या कारनाम्यामुळे तो ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
बाद फेरीतून जसे देश बाहेर पडतील त्या देशाची तो बियर पिणार आहे. मग अंतिम सामन्यात तो कोणती बियर पिणार हे बघण्याचे ठरेल.