फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीला शनिवार,३० जूनला सुरवात होत आहे. यामध्ये पहिला सामना गतउपविजेता अर्जेंटीना आणि बलाढ्य फ्रान्स तर दुसरा सामना पोर्तूगाल वि.उरुग्वे यांच्यात होत आहे.
मात्र साऱ्या फुटबॉलविश्वाच्या नजरा बाद फेरीच्या पहिल्या सामन्याकडे लागल्या आहेत. यामध्ये स्पर्धेची निराशाजनक सुरवात करत अडखळत बाद फेरी गाठलेल्या लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटीना संघाचा सी गटात अव्वल स्थानी राहिलेल्या फ्रान्स समोर कस लागणार आहे.
गतउपविजेता अर्जेंटीना संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा पूर्णपणे मेस्सीच्या खेळावर अवलंबून आहेत. तर तिकडे फ्रान्सकडे किलियन एमबापे, ग्रिजमन, ओस्माने डेम्बले, नबील फेकिर आणि ओलिवियर गिरोड यांच्यासारखे तगडे खेळाडू आहेत.
संपूर्ण स्पर्धेत मेस्सीसह एकाही अर्जेंटीनाच्या फुटबॉलपटूची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. चमत्कारीकरित्या बाद फेरीत पोहचलेल्या अर्जेंटीना संघाला तगड्या फ्रान्सला पराभूत करायचे असेल तर त्यांना फक्त मेस्सीवर अवलंबून न राहता सांघिक खेळ करण्याची गरज आहे.
गट फेरीतील फ्रान्सची कामगिरी
फ्रान्स वि.ऑस्ट्रेलिया २-० ने विजयी
फ्रान्स वि.पेरू १-० ने विजयी
फ्रान्स वि. डेनमार्क ०-० बरोबरी
गट फेरीतील अर्जेंटीनाची कामगिरी
अर्जेंटीना वि.आइसलॅंड १-१ बरोबरी
अर्जेंटीना वि.क्रोएशिया ३-० ने पराभूत
अर्जेंटीना वि.नायजेरीय २-१ ने विजयी
सामन्याची वेळ
शनिवार, ३० जून
सायंकाळी: ७:३० वाजता
थेट प्रेक्षपण
सोनी टेन १, सोनी टेन २, सोनी टेन एचडी
महत्त्वाच्या बातम्या:
–फिफा विश्वचषक: आजपासून सुरु होणार नव्या विजेत्याचा शोध
–फिफा विश्वचषक: गट फेरीतील दुसऱ्या स्थानाचा इंग्लंडला होणार मोठा लाभ