---Advertisement---

सौरव गांगुली म्हणतो, हाच ‘दादा’ संघ फिफा विश्वचषकात मारणार बाजी

---Advertisement---

14 जूनपासून फुटबॉल विश्वचषकाला रशियामध्ये सुरवात होत आहे. या विश्वचषकाची ऊत्सुकता भारतीय फुटबॉल चाहत्यांमध्येही निर्माण झाली आहे. यामधे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीही मागे नाही.

फुटबॉलचा निस्सिम चाहता असलेला गांगुलीलाही कोलकाता वासियांप्रमाणेच फुटबॉलचे प्रचंड वेड आहे. आयएसएलमधील अॅटलॅटिको दी कोलकाता या संघाचा तो सहमालक आहे. यावरूनच आपण त्याच्या फुटबॉल प्रेमाचा अंदाज लावू शकतो.

कोलकाता येथील एका कार्यक्रमात गांगुलीने फुटबॉल विश्वचषकाबरोबरच अर्जून तेंडूलकरच्या अंडर-19 संघातील निवड आणि भारताच्या इंग्लंड दौऱ्याविषयी आपली मते व्यक्त केली.

तो कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, “मी सर्व कोलकाता वासियांप्रमाणे या विश्वचषकात ब्राझिल संघाला पाठिंबा देणार आहे. जरी माझा आवडता संघ ब्राझिल असला तरी, मी अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीचा खेळ पाहण्यास आतुर झालो आहे. मेस्सी हा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक आहे. 2014 च्या फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिनाला जर्मनीकडून पराभूत व्हावे लागले होते. पण कदाचित मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक असेल. त्यामुळे मला वाटते की हा विश्वचषक अर्जेंटिनाने जिंकावा.”

या विश्वचकात अर्जोंटिना, ब्राझिल आणि जर्मनी हे संघ विजेतेपदाचे प्रमुख दावेदार असतील असे तो म्हणाला.

तसेच यावेळी बोलताना गांगुलीने अर्जून तेंडूलकरची अंडर-19 संघात निवड झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले.

त्याने इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाला तिथे चांगली कामगिरी करण्याची संधी असल्याचेही सांगितले. तो म्हणाला जर पाकिस्तान इंग्लंडला हरवू शकते तर भारत का नाही? भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा कित्येक पटीने भारी आहे. त्यामुळे यावेळची संधी भारताने दवडू नये.

वाचा- मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment