---Advertisement---

फिफा विश्वचषकाच्या थीम साॅंगला तब्बल ३८ मिलीयन विव्ज!

On: शनिवार, जून 9, 2018 1:51 PM
---Advertisement---

रशियात सुरू होणाऱ्या फिफा विश्वचषकाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे जगात सगळ्यांचाच उत्साह शिगेला पोहचला आहे.

त्यातच फुटबॉलसाठीच्या ‘लीव्ह इट अप’ या थीम सॉंगचा व्हिडीओ रिलीज झाला आहे. हे सॉंग निकी जॅम याने गायले असून त्याला विल स्मिथ आणि इरा इस्ट्रेफी या दोघांनी साथ दिली आहे.

हे सॉंग यु ट्युब वर 39 मिलीयन वेळा पाहिले गेले आहे. तर आज रिलीज झालेल्या व्हिडीओला एका तासांत 1,27,000 व्ह्युज मिळाले आहे.

https://twitter.com/FIFAWorldCup/status/1004981854091411458

आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात या तिघांबरोबर 2002चा विश्वचषक विजेता ब्राझिल संघाचा खेळाडू रोनाल्डिन्हो सुद्धा आहे. यात त्याने त्याच्या खेळाचेही कौशल्य दाखवले आहे.

यावरूनच ब्राझिलच्या या महान खेळाडूने जगाला दाखवून दिले की तो अजूनही मैदानाबाहेरही तेवढाच सक्रिय आहे.

14 जूनला सुरू होणाऱ्या या विश्वचषकातील पहिला सामना यजमान संघ रशिया विरूध्द सौदी अरेबिया असा होणार आहे.

Live It Up (Official Video) - Nicky Jam feat. Will Smith & Era Istrefi (2018 FIFA World Cup Russia)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment