कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात सोमवारी (5 डिसेंबर) दुसरा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया यांच्या दरम्यान खेळला गेला. ब्राझीलने आपला परंपरागत आक्रमक खेळ दाखवत कोरियाला 4-1 असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत जागा बनवली. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना मागील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झालेल्या क्रोएशियाशी होईल. दिवसातील पहिल्या सामन्यात क्रोएशियाने जपानचा पेनल्टी शूट आउटमध्ये पराभव केला होता.
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 5, 2022
साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात अनपेक्षित पराभव पत्करावा लागलेल्या ब्राझीलने या सामन्यात अशी कोणतीही शंका ठेवली नाही. अवघ्या सातव्या मिनिटालाच गोल करत त्यांनी आघाडी बनवली. दुखापतीनंतर संघात परतलेला स्टार स्ट्रायकर नेमार याने तेराव्या मिनिटाला ही आघाडी दुप्पट केली. ब्राझीलचे हे आक्रमण असेच कायम राहिले व 29 व्या मिनिटाला रिचालिसने संघाला आणखी एक गोल करून दिला. 36 व्या मिनिटाला पक्वेटाने चौथा गोल करून ब्राझील या सामन्यात हरणार नाही याची खबरदारी घेतली. त्यानंतर ब्राझीलकडून एकही गोल होऊ शकला नाही. 76 व्या मिनिटाला दक्षिण कोरियासाठी एकमेव गोल आला.
ब्राझीलने यापूर्वी 1954 मध्ये मेक्सिकोविरुद्ध पहिल्या हाफमध्ये चार गोल मारले होते. त्या संघाचे सदस्य असलेल्या पेले यांनाच ब्राझील संघाने हा विजय अर्पण केला. फुटबॉलचे सम्राट मानले जाणारे पेले यांची प्रकृती सध्या ढासळली आहे. त्यांच्यासाठी चाहते प्रार्थना करताना दिसतात.
दिवसातील पहिल्या सामन्यात जपानने क्रोएशियाला चांगली झुंज दिली. पूर्णवेळ आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेतही सामना 1-1 अशा बरोबरीत राहिला. अखेर पेनल्टी शूटआउटमध्ये क्रोएशियाने 3-1 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली.
(FIFA WORLD CUP Brazil Beat South Korea Entered In Quarter Finals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला ‘डबल ट्रबल’! लाजिरवाण्या पराभवानंतर खेळाडूंच्या खिशालाही लागली कात्री; आयसीसीने केली कारवाई
आपल्याच खेळाडूला कोट्यावधी कमावण्यापासून रोखत आहेत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक, वाचा संपूर्ण प्रकरण