कतार येथे सुरू झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सोमवारी इंग्लंड आणि इराण या संघां दरम्यान सामना खेळला गेला. ब गटातील या सामन्यात इंग्लंडने इराणचा अक्षरशः धुव्वा उडवत 6-2 असा दणदणीत विजय मिळवला.
A strong start to the #FIFAWorldCup for @England! 👊 #Qatar2022 pic.twitter.com/q7uW61H7ER
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 21, 2022
खलीफा इंटरनॅशनल स्टेडियम दोहा येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडचा संघ विजयाचा दावेदार म्हणून मैदानात उतरला होता. युरो कपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर इंग्लंड आपले दुसरे विश्वविजेते पटकावण्याचे उद्दिष्ट घेऊन या स्पर्धेत सहभागी झाला आहे. या सामन्यात त्यांनी खेळही तसाच दाखवला. पहिल्या अर्ध्या तासात इराणने इंग्लंडला चांगलेच झुंजवले. मात्र, अखेर 35 व्या मिनिटाला इंग्लंडला यश मिळाले.
इंग्लंडसाठी बेलिंगहमने शानदार गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यानंतर काही क्षणातच इंग्लंडला एक मोठा धक्का बसला. संघाचा प्रमुख बचावपटू हॅरी मॅग्वायर दुखापतग्रस्त होऊन माघारी परतला. परंतु, संघावर त्याचा तितकासा परिणाम झाला नाही. बुकायो साकाने 43 व्या तर पहिल्या हाफच्या एक्स्ट्रा टाईममध्ये रहीम स्टर्लिंगने गोल करत इंग्लंडला 3-0 अशी मोठी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या हाफमध्ये इंग्लंडने आपला तोच आक्रमक खेळ कायम राखला. साकाने 62 व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी वाढवली. तर 65 व्या मिनिटाला इराणसाठी तारेमीने गोल केला. एक गोल झाला असला तरी इंग्लंडच्या आक्रमकांनी आपला स्वाभाविक खेळ बंद केला नाही. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन बाहेर गेल्यानंतर त्याच्या जागी आलेल्या जॅक ग्रिलिश तसेच दुसरा बदली खेळाडू मार्कस रशफोर्ड यांनी इंग्लंडचा आक्रमणाची धुरा सांभाळली. रशफोर्डने 71 तर ग्रिलिशने 89 व्या मिनिटाला गोल झळकावले. दुसऱ्या हाफच्या अतिरिक्त वेळेत तारेमीने आणखी एक गोल करत इराणच्या चाहत्यांना आनंदाची संधी दिली. पूर्ण वेळेनंतर इंग्लंडने 6-2 असा विजय मिळवत विजयी सलामी दिली. इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम याची उपस्थिती या सामन्यासाठी लाभली होती.
(FIFA World Cup England Beat Iran By 6-4)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारतीय म्हणतात दिग्गज, पण आपलेच काढतात इज्जत’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचे दु:ख आले बाहेर
अरुणाचल प्रदेशची असामान्य कामगिरी! लिस्ट ए क्रिकेटमध्ये रचला जगात कुणालाच न जमलेला विक्रम