क्रिकेटविश्वात असे काही गोलंदाज होते, ज्यांच्या गोलंदाजीवर खेळताना भल्याभल्या फलंदाजांनाही घाम फुटायचा. या वेगवान गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याचाही समावेश होतो. पाकिस्तानातच नाही, तर जागतिक क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्विंग गोलंदाजीची जेव्हाची चर्चा होते, तेव्हा त्यात अक्रमचे नाव सर्वात आधी घेतले जाते. यामुळेच त्याला क्रिकेट चाहते ‘स्विंगचा सुलतान’ म्हणतात. दिग्गज गोलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या वसीम अक्रम वादाच्या भोवऱ्यातही अनेकदा अडकला आहे. त्याच्यावर मॅच फिक्सिंगचेही आरोप लागले आहेत. तो नेहमीच याबाबत बोलत असतो की, पाकिस्तानचे लोक त्याला मॅच फिक्सर म्हणून ओळखतात. आता त्याने धक्कादायक वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला वसीम अक्रम?
माध्यमांशी बोलताना वसीम अक्रम (Wasim Akram) याने पुन्हा एकदा म्हटले आहे की, “पाकिस्तानची सोशल मीडिया जनरेशन आजही त्याला मॅच फिक्सर म्हणून ओळखतात.” त्याने असेही म्हटले की, “भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये किती प्रेम मिळते. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि भारतात, जेव्हाही जागतिक इलेव्हनची चर्चा होते, जगातील सर्वोत्तम गोलंदाजांबद्दल चर्चा होते, तेव्हा माझे नाव येते. मात्र, पाकिस्तानमध्ये सोशल मीडियाची पिढी आहे, जी मला एक मॅच फिक्सर म्हणते.”
https://twitter.com/wwos/status/1594141603693985794?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1594141603693985794%7Ctwgr%5E45f959e475e4b7ec8c3e315232c079fe9ba5bdfc%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fcricket%2Fapni-baat-wasim-akram-on-pakistan-social-media-generation-fan-said-they-still-remain-me-as-a-match-fixer-23217901.html
यावेळी त्याने पुढे बोलताना असेही म्हटले की, “मी आपल्या आयुष्यातील त्या टप्प्यातून गेलो आहे, जिथे मला लोकांची चिंता करावी लागते.”
वसीम अक्रमबद्दलच्या अफवा
वसीम अक्रमबद्दल अशी अफवा आहे की, त्याने 1996च्या पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा सामना फिक्स करण्याचा प्रयत्न केला होता. याव्यतिरिक्त उपांत्यपूर्व सामन्यातही त्याच्या भारताविरुद्ध उशिरा न खेळण्याच्या निर्णयाबद्दलही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्या सामन्यात पाकिस्तान पराभूत झाला होता.
वसीम अक्रमची कारकीर्द
वसीम अक्रमच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर ती खूपच शानदार राहिली आहे. त्याने 104 कसोटी सामन्यात 414 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने 356 वनडे सामन्यात 502 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांनी केलेले हे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. (former pacer wasim akram on pakistan social media generation fan said they still remain me as a match fixer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्वत:साठी नाही, तर संघासाठी! धावा कुटण्याच्या नादात विक्रम मोडलाय हेच विसरून गेलेला जगदीशन, म्हणाला…
पंतची जागा घेण्यासाठी सज्ज झाला ‘हा’ यष्टीरक्षक, सलग 5 शतकांचा पाऊस पाडत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा