Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीलंका क्रिकेटमध्ये सनथ जयसूर्या, वसीम अक्रम यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

श्रीलंका क्रिकेटमध्ये सनथ जयसूर्या, वसीम अक्रम यांना मिळाली 'ही' मोठी जबाबदारी

November 19, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Sanath Jayasuriya & Wasim Akram

Photo Courtesy: Twitter/ICC


पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रम यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यांना आगामी लंका प्रीमियर लीगच्या हंगामासाठी ब्रॅंड ऍम्बेसेडर बनवले आहे. लंका प्रीमियर लीगचा हा तिसरा हंगाम असणार आहे. आधी झालेले दोन हंगाम यशस्वीरित्या पार पडले. अक्रम यांच्याबरोबरच श्रीलंकेचे दिग्गज सनथ जयसूर्या यांनाही लीगचे ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. 

वसीम अक्रम (Wasim Akram) यांनी निवड झाल्याबद्दल आपला आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “नेहमीच श्रीलंकेच्या चाहत्यांकडून आदर आणि सन्मान मिळाला आहे. श्रीलंका प्रीमियर लीगमधून (एलपीएल) चांगल्या प्रतीचे खेळाडू तयार केले जात आहेत. आशिया चषकातील विजय हा त्याचे मोठे उदाहरण आहे.”

पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने म्हटले, “मी एलपीएलच्या मागील दोन हंगामातील आणि क्रिकेटची स्थिती पाहिली आहे. ती उत्तम दिसली असून पुढील हंगामांमध्येही खेळाडू क्रिकेटचा दर्जा कायम राखतील अशी अपेक्षा आहे.”

सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) यांनीही आपला आनंद व्यक्त केला असून म्हणाले, “एलपीएलच्या तिसऱ्या हंगामासाठी ब्रॅंड ऍम्बेसडर झाल्याने आनंदी आहे. क्रिकेटमध्ये उत्तोमत्तम खेळाडू शोधण्यासाठी हा मंच लाभला.”

जयसूर्याने श्रीलंकेसाठी 20,000 पेक्षा अधिक धावा आणि 440 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे पाकिस्तानसाठी अक्रम यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 916 विकेट्स घेतल्या आहेत.

मागील काही महिन्यांमधील श्रीलंका क्रिकेट संघाची प्रगती पाहिली तर एक गोष्ट लक्षात येथे एलपीएलमुळे त्यांना फायदाच झाला आहे. कोरोना व्हायरस आणि राजनीतिच्या गडबडीमध्येही श्रीलंका क्रिकेटवर त्याचा परिणाम दिसला नाही.

मागील खेळल्या गेलेल्या एलपीएलच्या दोन हंगामांमध्ये जाफना किंग्जने आपली दरार कायम राखला आहे. त्यांनी दोन विजेतेपद पटकावल्याने पुढील हंगामात त्याची हॅट्ट्रीक पूर्ण करण्याच्या हेतूमध्ये ते असणार आहेत. यंदा एलपीएल 6 डिसेंबर ते 23 डिसेंबर पर्यंत खेळली जाणार आहे. या लीगमध्ये काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही सहभाग असणार आहे. त्यामध्ये एविन लुईस, कार्लोस ब्रेथवेट, जानेमन मलान, डार्सी शॉर्ट आणि शोएब मलिक इत्यादींचा समावेश आहे. Sanath Jayasuriya, Wasim Akram become brand ambassadors of lanka premier league

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्रविडच्या बचावासाठी उतरला अश्विन! रवी शास्त्रींना म्हणाला, ‘टी20 विश्वचषकासाठी त्यांनी किती मेहनत…’
या पाच पात्रता असतील तरच होता येणार टीम इंडियाचा नवा निवडकर्ता; बीसीसीआयने घातलीये अट


Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCI

टीम इंडियाच्या नव्या निवडकर्त्यांच्या जबाबदाऱ्या घ्या जाणून, बीसीसीआयने जाहीर केली यादी

Virat Kohli & R Ashwin & Chetan Sharma

कर्मच! बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केल्यानंतर विराटच्या चाहत्यांचा टिवटिवाट

Hardik-Pandya-and-Rohit-Sharma

कर्णधारपदाबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय; रोहित शर्मा वनडे आणि कसोटी संघाचा तर, हार्दिक पंड्या टी20चा कॅप्टन!

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143