लंडन | रशियात 14 जूनला सुरु झालेल्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना 15 जुलैला होणार आहे.
तर 2 जुलैला सुरु झालेल्या 2018 च्या विंम्बडन स्पर्धाच्या पुरुष एकेरीचा अंतिम सामनाही 15 जुलैला होणार आहे.
विंम्बलडनच्या पुरूष एकेरीचा सामना 15 जुलै रोजी स्थानिक वेळेप्रमाणे दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. तर फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना दुपारी 4 वाजता सुरु होणार आहे. त्यात टेनिसचा सामना नक्की किती वेळ चालेल याची कोणतीही शाश्वती नसते. त्यामुळे या दोन खेळात प्रेक्षक विभागण्याची शक्यता आहे.
फुटबॉल आणि टेनिसला इंग्लंडसहीत साऱ्या जगभरात मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग लाभला आहे.
तसेच इंग्लंडचा फुटबॉल संघ फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचला आहे. इंग्लंच्या अंतिम फेरीत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेले काही दिवस विंम्बलडन पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्याची वेळ बदलण्याच्या चर्चा सुरु होत्या.
फेडरर म्हणतो-
हे होणारच होते. मी फायनलमध्ये असो किंवा नसो विंबल्डन फायनल होणारच आहे. तसेच फिफा फायनलमध्येही काही बदल होणार नाहीत.
मला वाटतंय की फिफा फायनलसाठी थोडं अवघड होऊ शकतं. कारण विंबल्डन फायनल आधीपासूनच सुरु झालेली असेल. त्यामुळे मैदानात असलेल्या फूटबाॅलप्रेमींमध्ये आधीपासूनच विंबल्डनमध्ये काय गुण आहेत याची चर्चा करत असेल आणि त्यामुळे खेळाडूंचे लक्ष विचलीत होईल.
माझ्यासाठी विंबल्डन किती महत्त्वाचे आहे याचा अंदाज यावरुन तुम्हाला येईल. तुम्ही वेळ बदलण्याचा प्रश्न विंबल्डनला विचारण्यापेक्षा फिफा आयोजकांना विचारायला हवा.
महत्त्वाच्या बातम्या-
-एकवेळ चालवत होता पाणीपुरीचा गाडा आता थेट भेटला मास्टर ब्लास्टर सचिन…
-रोहीतच्या नावावर असाही एक पराक्रम ज्याचा विचार काही खेळाडू फक्त करु…