कतार येथे खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक 2022च्या स्पर्धेत गुरूवारी (1 डिसेंबर) दोन सामने खेळले गेले. यामध्ये लियोनल मेस्सी याच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचा सामना रॉबर्ट लेवांडोस्की याच्या पोलंडशी झाला. ज्यामध्ये अर्जेंटिनाने 2-0ने विजय मिळवला. हा सामना स्टेडियम 974 अर्थातच रास अबू अबौद येथे खेळला गेला.
या विजयाबरोबरच अर्जेंटिनाने ग्रुप सी च्या गुणतालिकेत पहिले स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडाक्यात प्रवेश केला. सुपर 16मध्ये अर्जेंटिनाचा सामना ऑस्ट्रेलियाशी (4 डिसेंबर) होणार आहे. दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोने सौदी अरेबियाला 2-1 असे पराभूत केले.
पोलंडविरुद्ध लियोनस मेस्सी (Lionel Messi) जरा अडखळताना दिसला. त्याला 39व्या मिनिटाला पेनल्टमार्फत गोल करण्याची संधी होती, मात्र ती त्याने गमावली. असे असले तरी अर्जेंटिनाचा संघ खचला नाही. त्यांनी त्यांची जबरदस्त कामगिरी सुरूच ठेवली. अर्जेंटिनाचे या सामन्यात इतके वर्चस्व होते की असे वाटत होते खेळाडू पोलंडच्या गोलपोस्टपाशीच खेळत होते.
Argentina turn on the style to finish top of Group C!@adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 30, 2022
मेस्सीचा विक्रम
या सामन्यासाठी मैदानावर उतरताच मेस्सीने इतिहास ररचला. तो अर्जेंटिनाकडून विश्वचषकाचे सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला. याबाबतीत त्याने दिग्गज मेराडॉना यांना मागे टाकले. मेस्सीने 22 सामने खेळताना 15 सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे.
अर्जेंटिनाचे ‘ते’ दोन विजयी गोल
अर्जेंटिना विरुद्ध पोलंड सामन्यातील पहिल्या सत्रात एकही गोल झाला नाही. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला तेव्हा अर्जेंटिना आक्रमक दिसली आणि त्याचा परिणाम म्हणून 46व्या मिनिटाला अर्जेंटिनाने गोल करत सामन्यात आघाडी केली. हा गोल ऍलेक्सिस मॅक ऍलिस्टर (Alexis Mac Allister) याने मोलिगा याच्या असिस्टवर केला.
अर्जेटिनासाठी दुसरा गोल जूलियन अल्वारेज (Julián Álvarez) याने केला. 67व्या मिनिटाला केलेल्या गोलसाठी त्याला एन्झो फर्नांडीझ याने असिस्ट केले आणि सामन्यात अर्जेंटिनाची स्थिती आणखी मजबूत केली.
🙌 See you both in the Round of 16! 🫶@Argentina | @LaczyNasPilka | #FIFAWorldCup pic.twitter.com/iu1vuwkH75
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 30, 2022
सामना जिंकूनसुद्धा मेक्सिको बाहेर
दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोचा संघ चांगला लयीत दिसला. त्यांनी सौदी अरेबियाला 2-1ने पराभूत केले. हा सामना इतका रोमांचक होता की हे सर्व तिन्ही गोल दुसऱ्या सत्रात केले गेले. हा सामना जिंकत मेक्सिकोने गुणांच्या तुलनेत पोलंडची बरोबरी केली, मात्र गोल फरकाने उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला नाही.
Mexico win but it is not quite enough! @adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 30, 2022
अरेबियाने 95 व्या मिनिटाला गोल करताच पोलंड उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. यामुळे ग्रुप सी मधून सौदी अरेबिया आणि मेक्सिको बाहेर झाले आहेत. सुपर 16मध्ये पोलंडचा सामना गतविजेत्या फ्रांसशी (4 डिसेंबर) होणार आहे.FIFA World Cup: Lionel Messi makes history as Poland advance to quarter-finals despite losing to Argentina
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक आणि नताशाचा डान्स व्हायरल, चाहते म्हणत आहेत, ‘बायकोच्या इशाऱ्यावर…’
न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेेत ‘या’ खेळाडूंनी जिंकले शास्त्रींचे मन, माजी प्रशिक्षकांकडून स्तुतीसुमनांचा वर्षाव