ऑस्ट्रेलिया संघ भारताविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात पराभूत झाला. मात्र, 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात पाहुण्या संघाचे फलंदाज कडवी झुंज देताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावले असले, तरीही त्यांचा स्टार सलामीवीर डेविड वॉर्नर हा मात्र चांगलाच चमकला होता. त्याने पहिल्या दोन्ही सामन्यात अर्धशतक झळकावले होते. अशात आता वॉर्नरने तिसऱ्या वनडेतही तुफान फटकेबाजी करत सलग तिसरे अर्धशतक साकारले.
राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवरील तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांच्याकडून डावाची सुरुवात करण्यासाठी डेविड वॉर्नर (David Warner) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) सलामीला उतरले होते. यावेळी वॉर्नरने सुरुवात संथ केली, पण नंतर त्याने चांगलाच वेग पकडत फटकेबाजी केली.
Fifty by David Warner in just 32 balls!!
The vintage Warner is back ahead of the World Cup – 3rd consecutive fifty by Warner in this series. pic.twitter.com/NF9eE0LAAN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2023
वॉर्नरचे सलग तिसरे अर्धशतक
या सामन्यात वॉर्नरने धमाकेदार फलंदाजी करत 32 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने डावातील 8व्या षटकात मोहम्मद सिराज याच्या पाचव्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक ठरले. यातून त्याचे सातत्य पाहायला मिळाले. यासोबतच त्याने पाचव्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राईक आपल्याकडेच ठेवली.
Prasidh Krishna strikes for India!!
Finally an opening wicket for India after the early carnage. David Warner goes after a terrific fifty. pic.twitter.com/n1UP6KZ3cU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2023
प्रसिद्ध कृष्णाने धाडलं तंबूत
मात्र, 9व्या षटक टाकण्यासाठी आलेल्या प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) याच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नर यष्टीरक्षक केएल राहुल याच्या हातून झेलबाद झाला. त्यामुळे वॉर्नरला तंबूचा रस्ता पकडावा लागला. महत्त्वाची बाब अशी की, वॉर्नरने 7व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाला 3 चौकार आणि एक षटकार खेचला होता. मात्र, नवव्या षटकात कृष्णाने वॉर्नरचा काटा काढत त्याला तंबूचा रस्ता धरायला भाग पाडले. वॉर्नरने या सामन्यात एकूण 34 चेंडू खेळत 56 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 6 चौकारांचाही पाऊस पाडला. (Fifty by David Warner in just 32 balls but Prasidh Krishna strikes for India and take openers wicket)
हेही वाचा-
अब आयेगा मजा! तिसऱ्या वनडेत कमिन्स ‘टॉस का बॉस’, दोन्ही संघांच्या ‘या’ स्टार खेळाडूंचे पुनरागमन
वर्ल्डकपपूर्वी अश्विनबाबत रोहित शर्माची सर्वात मोठी प्रतिक्रिया, वाचून क्रिकेटप्रेमींनाही होईल आनंद