बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली.
त्याने उमेश यादवबरोबर 10 व्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचली. या अर्धशतकी भागीदारीमध्ये उमेशने फक्त 1 धावेची भर घातली. तर बाकी धावा विराटने काढल्या.
या दोघांनी जवळजवळ 11 षटके एकत्र फलंदाजी केली. पण यात फक्त 2 वेळाच असे झाले की उमेशला षटकातील पहिला चेंडू खेळावा लागला.
कारण विराट प्रत्येक षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव काढत स्ट्राइक स्वत:कडे ठेवण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे विराटच्या या धोरणाचे सर्वांनी कौतुक केले.
उमेशने या डावात 16 चेंडूत नाबाद 1 धाव केली आहे.
उमेश आणि विराटने केलेल्या या भागीदारीमुळे भारत आणि इंग्लंड यांच्या पहिल्या डावातील अंतर बरेचसे कमी झाले. अखेर आदिल रशीदला ही भागीदारी तोडण्यात यश आले. त्याने विराट चेंडूला 149 धावांवर बाद केले. त्यामुळे भारत पहिल्या डावात 13 धावांनी पिछाडीवर राहिला.
विराटच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 274 धावा केल्या. तर दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने 1 बाद 9 धावा केल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–विराट वादळात फारसा लक्षात न आलेला अश्निनचा हा कारनामा पहाच
–जगाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करणारा विराट केवळ चौथा भारतीय
–दिग्गज ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाला विराट कोहलीकडून धक्का