कोरोना व्हायरसचा जगभरात वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व देश या व्हायरसशी लढण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (21 मार्च) या व्हायरसला नष्ट करण्यासाठी भारतीय संघाच्या खेळाडूंचे उदाहरण दिले आहे.
यावेळी ते म्हणाले की, ज्याप्रकारे २००२च्या नेटवेस्ट सीरिजमध्ये (NatWest Series) इंग्लंडविरुद्ध युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) उत्कृष्ट भागीदारी रचून भारताला विजय मिळवून दिला होता, अगदी तशाच प्रकारे आपल्या या व्हायरसशी लढायचे आहे.
पंतप्रधान मोदींनी (Prime Minister Narendra Modi) गुरुवारी (१९ मार्च) देशाला संबोधित करत आज (२२ मार्च) सार्वजनिक कर्फ्यूचे पालन करण्यास सांगितले होते.
यानंतर कैफने भारतीय नागरिकांना पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाचे पालन करण्याचे आणि या व्हायरसला पसरण्यापासून रोखण्याचे आवाहन करत ट्वीट केले होते. यामध्ये त्याने लिहिले की, ही वेळ आहे आणखी एक भागीदारी करण्याची.
कैफने केलेल्या ट्वीटला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले की, “भारतीय संघाच्या २ क्रिकेटपटूंचे मोलाचे योगदान विसरता येत नाही. युवराज आणि कैफने म्हटल्याप्रमाणे ही वेळ आणखी एक भागीदारी करण्याची आहे. यावेळी सर्व भारतीय कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी भागीदारी करतील.
युवराज आणि कैफने २००२मध्ये लॉर्ड्स येथे नेटवेस्ट सीरिजच्या अंतिम सामन्यात १२१ धावांची भली मोठी भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-सरावावरुन घरी परतणाऱ्या हरियाणाच्या क्रिकेटरचा अपघातात मृत्यु
-भारतीय गोलंदाजांना दुरून खेळणं सोप्पं वाटतं, मैदानात फुटतो घाम
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण