---Advertisement---

लढवय्या श्रीजेश पुन्हा बनला भारताचा तारणहार, ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियमला चारली धूळ

On: रविवार, जून 12, 2022 5:59 PM
---Advertisement---

ऑलिम्पिक २०२०मध्ये जर्मनी विरुद्धच्या सामन्यात पेनल्टी कॉर्नर वाचवून भारताला कांस्य पदक जिंकून देणाऱ्या पीआर श्रीजेशने पुन्हा एकदा त्याच्या अप्रतिम गोलकिपींगने संघाला विजय मिळवून दिला आहे. भारतीय हॉकी संघाची ही अभेद्य भिंत बेल्जियमच्या विजयातील अडचण ठरली आहे. एंटवेर्प बेल्जियम येथे सुरू असलेल्या एफआयएच प्रो लीग स्पर्धेत भारताने यजमान संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. भारताच्या या विजयात हरमनप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग आणि शमशेर सिंग यांनी महत्वाची भुमिका पार पाडली आहे.

या सामन्यात भारतीय संघाने अमित रोहिदासच्या नेतृत्वाखाली खेळताना चांगली सुरूवात केली. पहिल्या सत्राच्या १५ मिनिटामध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. यामध्ये दोन्ही गोलकिपरनी उत्तम कामगिरी करत एकही गोल होऊ दिला नाही. दुसरे सत्र सुरू झाले असता १७व्या मिनिटाला अभिषेकच्या शॉटवर शमशेरने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्याच्या तीन मिनिटानंतरच बेल्जियमच्या चार्लर केड्रिकने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला.

बेल्जियमने ३५व्या आणि ५०व्या मिनिटाला गोल करत भारतीय संघाला १-३ने मागे ठेवले. त्याच्या पुढच्याच मिनिटाला मनप्रीत सिंगने संघाला पेनल्टी मिळवून देत हरमनप्रीत सिंगने त्याचे गोलमध्ये रूपांतर केले. सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना जर्मनप्रीतने गोल केला. सामन्याची पूर्ण ६० मिनिटे संपली असता दोन्ही संघ ३-३ असे बरोबरीत आल्याने पेनल्टी शूटआउटमध्ये सामन्याचा निकाल लागला.

हरमनप्रीत, ललित उपाध्याय आणि शमशेर या तिघांनी पेनल्टी शूटआउटमध्ये प्रत्येकी एक गोल केला आहे. बेल्जियमनेही तीन गोल करत शूटआऊटमध्ये ३-३ अशी बरोबरी साधली. यावेळी श्रीजेशचा अनुभव कामी आला. सामना ४-४ असताना त्याने शूटआउटमध्ये अलेक्झांडर हेन्ड्रीक्सचा गोल रोखला. नंतर आकाशदीप सिंगने नेटचा अचूक नेम साधला असता भारताचा शूटआउटमध्ये पाचवा यशस्वी गोल झाला

सामनावीर श्रीजेशने (PR Shreejesh) नेटमध्ये चपळाई दाखवत बेल्जियमचे अनेक गोल रोखले. त्याने चौथ्या आणि शेवटच्या सत्रात दोन महत्वाचे गोल वाचवत यजमान संघाला विजायापासून वंचित केले. या स्पर्धेत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताने ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियम संघाला पेनल्टी शूटआउटमध्ये ५-४ने पराभूत करत धमाकेदार विजय मिळवला आहे.

भारत विरुद्ध बेल्जियम हे पुन्हा आमन-सामने येणार आहेत. त्यांच्यातील दुसरा सामना रविवारी (१२ जून) रात्री ८ वाजता खेळला जाणार आहे.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आर्यन भुजबळ, रोनित मुथा, रोहन नागर यांची आगेकूच

कोर्टाने निर्णय दिला अन् महाराष्ट्रातील आयपीएल मॅचेस शिफ्ट केल्या गेल्या, काय होता तो किस्सा?

कर्णधार रिषभ पंतची बॅट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ओकणार आग! पूर्ण करणार षटकारांचे ‘हे’ खास शतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---