---Advertisement---

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध प्रतिष्ठेच्या सामन्यात भारतीय संघात मोठा फेरबदल! 5 खेळाडू बाहेर बसण्याची शक्यता

On: शुक्रवार, जुलै 10, 2026 9:56 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाची (Indian cricket team) टी-20 मधील कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. मात्र, गेल्या दोन मालिकांपासून संघाची कामगिरी खालावली आहे. आता 11 जुलै रोजी साउथहॅम्पटन येथे होणारा 5 वा टी-20 सामना टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपला पराभवाचा सिलसिला मोडीत काढण्यासाठी आणि मान राखण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडियाचे व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून या पाच खेळाडूंना बाहेर बसवू शकते.

हर्षित राणा: दुखापतीमुळे हर्षित राणा (Harshit Rana) या मालिकेच्या पाचव्या सामन्यातून बाहेर आहे, हे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे.

वरुण चक्रवर्ती: दुखापतीमुळे चौथ्या सामन्याला मुकलेल्या वरुण चक्रवर्तीला (Varun Chakraworty) पाचव्या सामन्यातही खेळता येणार नाही. त्याच्या अनुपस्थितीची उणीव टीम इंडियाला जाणवत आहे.

रवी बिश्नोई: फिरकीपटू रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) संघात पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याला शेवटच्या सामन्यातही बेंचवरच बसावे लागू शकते.

सूर्यांश शेडगे: वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगेला (Suryansh shedge) सध्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण आहे. त्याला आता झिम्बाब्वे मालिकेची वाट पहावी लागेल, कारण संघ व्यवस्थापन अक्षर पटेलला (Axar Patel) अजून एक संधी देण्याच्या विचारात आहे.

तिलक वर्मा: उपकर्णधार तिलक वर्माला (Tilak verma) बऱ्याच काळापासून संधी मिळत आहे, परंतु तो त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकलेला नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळले जाऊ शकते आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळू शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---