Ind vs Eng : आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. तर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तसेच हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आणि विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारतीय संघाने जिंकली होती. मात्र आता तिसरी कसोटी जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
तसेच, तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत संघात चार मोठे बदल करण्यात आले आहे. सर्फराज आणि ध्रुव जुरेल आंतरराष्ट्रीय पदार्पण करत आहेत. तर अनिल कुंबळेने पदार्पणाची कॅप सरफराजला दिली. त्याचवेळी दिनेश कार्तिकने ध्रुवला पदार्पणाची कॅप दिली आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करणारा सर्फराज हा 311 वा तर ध्रुव 312 वा खेळाडू आहे. सर्फराजला जेव्हा पदार्पणाची कॅप दिली जात होती, तेव्हा त्याचे प्रशिक्षक आणि वडील नौशाद खानही तिथे उपस्थित होते. आपल्या मुलाला टोपी मिळाल्याचे पाहून ते भावूक झालेले पहायला मिळाले आहे. याबरोबरच, सर्फराजच्या कारकिर्दीतील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल. तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. टेस्ट कॅप घेऊन सरफराज वडिलांकडे पोहोचला होता तेव्हा त्याचे वडील भावूक झाले आणि त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. त्याने सरफराजला मिठी मारली होती. तसेच सर्फराजची आई देखील भावूक झालेली पहायला मिळाली आहे.
दरम्यान, सर्फराज खानचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला असून त्याने प्रथम श्रेणीतही त्रिशतक झळकावले आहे. तसेच या फॉरमॅटध्ये 45 सामन्यांत त्याने 3912 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 14 शतके आणि 11 अर्धशतके केली आहेत. सर्फराजची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 301आहे. त्याने 37 लिस्ट ए सामन्यात 629 धावा केल्या आहेत. तर सरफराजने 96 टी-20 सामनेही खेळले आहेत. यामध्ये 1188 धावा केल्या आहेत.
Video of the day. ❤️
Emotions from Sarfaraz Khan, his father & wife during cap presentation – he has made everyone proud. pic.twitter.com/JeXsmeKoof
— Johns. (@CricCrazyJohns) February 15, 2024
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
महत्वाच्या बातम्या –
- Ind vs Eng : तिसऱ्या कसोटीत सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, अखेर सर्फराज खान अन् ध्रुव जुरेल यांचे पदार्पण
- हार्दिकचा पत्ता कट, टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा हाच भारताचा कर्णधार! जय शहा यांची मोठी घोषणा – पाहा व्हिडिओ