आगामी टी20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma News) करणार असल्याचे जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jai Shah News) यांनी बुधवारी (दि. 14) याबाबत स्पष्टोक्ती केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup 2024) जिंकेल, अशी घोषणा जय शहा यांनी केली. तसेच हार्दिक पंड्या हा कर्णधार नव्हे तर उपकर्णधार असेल, अशीही माहिती दिली. त्यामुळे टी20 वर्ल्डकप मध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल? या प्रश्नांना आता पुर्णविराम लागला आहे.
गुरुवार (दि. 15) पासून भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोट येथे सुरु होत आहे. तत्पुर्वी सामन्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राजकोट स्टेडियमचे नामकरण निरंजन शहा स्टेडियम करण्यात आले. कार्यक्रमावेळी बीसीसीआय सचिव जय शहा उपस्थित होते. तेव्हा त्यांनी बोलताना, ‘आपण जरी 2023 ची वर्ल्डकप फायनल हरलो असलो तरी आपण सलग 10 सामने जिंकून चाहत्यांची मने जिंकली आहे. मला विश्वास आहे की आपण रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली 2024 चा टी 20 वर्ल्डकप नक्कीच उंचावू.’ असे शहा यांनी म्हटले आणि रोहितच्या टी20 विश्वचषकातील कर्णधारपदावर शिक्कामोर्तब केले. (Rohit Sharma To Captain Of India Team In T20 World Cup 2024 BCCI Secretary Jai Shah Announced)
भारतीय संघाचे टी-20 वर्ल्डकपमध्ये नेतृत्व कोण करणार? याची मोठी चर्चा होत होती. यात हार्दिक पांड्या ह्याचे नाव आघाडीवर होते. परंतू रोहित टी20 संघात परतला आणि त्याने शतक साकारले. तसेच विराटनेही सातत्याने फलंदाजी केली. त्यामुळे या चर्चा अधिक खमंग झाल्या. परंतू मधल्या काळात हार्दिक पांड्या हा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. विराटही कौटुंबिक कारणामुळे सध्या काही सामने मुकला आहे. अशात रोहित सातत्यपूर्ण संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे त्याच्याच हाती पुन्हा एकदा आणखीन एका आयसीसी स्पर्धेची कमान सोपवण्यात आली आहे. ही अधिकृत घोषणा नसली तरीही जय शहा यांचे वक्तव्य हेच पुढे निवड समितीकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.
Jay Shah said “India will win the T20 World Cup under the leadership of Rohit Sharma”. 🇮🇳pic.twitter.com/kPYEyf2WwO
— Johns. (@CricCrazyJohns) February 14, 2024
स्टेडियमचे नाव बदलले –
बुधवारी झालेल्या कार्यक्रमात राजकोटमधील स्टेडियमचे नाव बदलण्यात आले. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे नाव बदलून स्टेडियमचे नवीन नाव निरंजन शाह स्टेडियम असे करण्यात आले. याद्वारे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि वरिष्ठ क्रिकेट प्रशासक निरंजन शाह यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
VIDEO | Here’s what Asian Cricket Council president and BCCI secretary Jay Shah (@JayShah) said while addressing an event in Rajkot.
“In 2023 (final) at Ahmedabad, even though we did not win the World Cup after 10 straight wins, we won hearts. I want to promise you that in 2024… pic.twitter.com/GcEJjSdiLs
— Press Trust of India (@PTI_News) February 14, 2024
“INDIA WILL LIFT THE T20 WORLD CUP UNDER ROHIT SHARMA’S CAPTAINCY”-Jay Shah
Script writer ne climax bata diya lesgooooo🥳🥳🥳#JayShah #RohitSharma𓃵#T20WorldCuppic.twitter.com/AaKi3HbH08— Dhwani (@Dhwani_1997) February 14, 2024
अधिक वाचा –
– IND vs ENG 3rd Test : इंग्लंडकडून राजकोट कसोटीसाठी प्लेइंग 11 ची घोषणा! प्रमुख गोलंदाजाचं कमबॅक तर बशीर बाहेर
– Wrestling Federation of India : भारतीय कुस्तीसाठी आनंदाची बातमी; UWWने निलंबन घेतलं मागे…
– IPL दरम्यान BCCI खेळणार मोठा डाव, टीम इंडियाचे खेळाडू जाणार अमेरिकेला, घ्या जाणून काय आहे कारण…