---Advertisement---

Ind vs Eng : तिसऱ्या कसोटीत सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, अखेर सर्फराज खान अन् ध्रुव जुरेल यांचे पदार्पण

On: गुरूवार, फेब्रुवारी 15, 2024 9:09 AM
---Advertisement---

Ind vs Eng : आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. तर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तसेच हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली आणि विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी भारतीय संघाने जिंकली होती. मात्र आता तिसरी कसोटी जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

याबरोबरच, राजकोटच्या या मैदानावर दोन्ही संघांमधील ही दुसरी कसोटी आहे. याआधी 2016 मध्ये दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने आले होते, तो कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. याबरोबरच, इंग्लंडच्या टीमने सामन्याच्या एक दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती.

एकीकडे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स १०० वा कसोटी सामना खेळत आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाची मधली फळी नवख्या फलंदाजांची आहे. रजत पाटीदार गेल्या सामन्यात आपला पहिला सामना खेळला होता, तर आज सर्फराझ खान आणि यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ध्रुव जुरेलला पदार्पणाची संधी मिळाली आहे. या नव्या पिढीवर भारतीय संघाची मोठी जबाबदारी असणार आहे.

तसेच, तिसऱ्या कसोटीत सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच, भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. तर सर्फराज आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल भारताकडून या कसोटीत पदार्पण करत आहेत. दोघांचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण आहे. अनिल कुंबळेने पदार्पणाची कॅप सरफराजला दिली. त्याचवेळी दिनेश कार्तिकने ध्रुवला पदार्पणाची कॅप दिली आहे.

दरम्यान, कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा सर्फराज हा 311 वा तर ध्रु 312 वा खेळाडू आहे. सर्फराजला जेव्हा पदार्पणाची कॅप दिली जात होती, तेव्हा त्याचे प्रशिक्षक आणि वडील नौशाद खानही तिथे उपस्थित होते.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---