---Advertisement---

लॉयला फुटबॉल कप । लॉयला हायस्कूल आणि बिशप्स स्कूलमध्ये फायनल

On: रविवार, जुलै 30, 2023 8:07 PM
Finals between Loyola High School and Bishop's School
---Advertisement---

पुणे, ता. २९ : यजमान लॉयला हायस्कूलने लॉयला फुटबॉल कप स्पर्धेत तीन गटांतून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना तिहेरी मुकुटाची संधी आहे. लॉयलाने १२, १४ आणि १६ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत प्रवेशकेला.

पाषाण येथील लॉयला हायस्कूलच्या मैदानावर या उपांत्य लढती रंगल्या. लॉयलाचे माजी विद्यार्थी आणि लॉयला हायस्कूलच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १२ वर्षांखालील मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य लढतीत बिशप्स स्कूलने सेंट व्हिन्सेंट हायस्कूलवर ३-१ने मात केली. बिशप्सची अंतिम लढत लॉयला हायस्कूलविरुद्ध होणार आहे. लॉयलाने हचिंग्ज हायस्कूलवर टायब्रेकमध्ये मात केली. चौदा वर्षांखालील गटात बिशप्स स्कूलने जे. एन. पेटिट हायस्कूलवर ३-०ने विजय मिळवला. बिशप्स आणि लॉयलामध्ये अंतिम लढत रंगणार आहे. १६ वर्षांखालील गटाचीही फायनल बिशप्स स्कूल आणि लॉयलामध्ये रंगणार आहे. (Finals at Loyola High School and Bishop’s School)

उपांत्य फेरीचे निकाल :
१२ वर्षांखालील मुले – बिशप्स स्कूल, कॅम्प – ३ (हितांश खात्री ६, १७, परम बेदमुथा ४०+२) वि. वि. सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूल – १ (जोएल चेरियन २९ मि.).

१४ वर्षांखालील मुले – द बिशप्स स्कूल, कॅम्प – ३ (जोशुआ सोंगाटे २८, रेहान जयपुरी ३२ मि., अर्जुन देशपांडे ५०+१) वि. वि. जे. एन. पेटिट टेक्निकल हायस्कूल – ०.

१६ वर्षांखालील मुले – द बिशप्स स्कूल, कॅम्प – ३ (इक्बाल शेख ४३, ६०+२ मि., अरिझ शेख ५० मि.) वि. वि. सेंट व्हिन्सेंट हायस्कूल – २ (आर्यन सूर्यवंशी ४१, नील सेनगुप्ता ५२ मि.).

१२ वर्षांखालील मुले – लॉयला हायस्कूल – ० (३, १) (अनुराग पारसनीस, ऑस्टिन जेम्स, अभीर पाटील, मेधांश लिंगम) वि. वि. हचिंग्ज हायस्कूल – ० (३, ०) (अहारशी हझरा, पार्थ पाटील शिवराज घुगे).

१४ वर्षांखालील मुले – लॉयला हायस्कूल – ४ (परम कुलकर्णी १८, पार्थ शिंदे २०, ऋत्विक मोरे २९, आयुष चव्हाण ५०+१ मि.) वि. वि. हचिंग्ज हायस्कूल – १ (वरुणतिरुवल्लूवन ३९ मि.)

१६ वर्षांखालील मुले – लॉयला हायस्कूल – ४ (वेदांत गुप्ता १३, वेदांत कांबळे २३, अथर्व सोनावणे ३७, रुद्रा शेलार ४३ मि.) आणि ब्लू रिद्ज पब्लिक स्कूल – ०.

महत्वाच्या बातम्या –
कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर ब्रॉडने मारला गगनचुंबी षटकार, व्हिडिओ पाहून फिरतील तुमचेही डोळे
‘ब्रॉडी तुला सलाम’, ब्रॉडच्या रिटायरमेंटवर आली युवीची प्रतिक्रिया, शेअर केले खास छायाचित्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---