ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 (2022 T20 World Cup Super 12) फेरीला 22 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. मुख्य फेरीतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड (AUSvNZ) यांच्यादरम्यान सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने शानदार खेळ दाखवला. आपला पहिला विश्वचषक खेळत असलेल्या सलामीवीर फिन ऍलन (Finn Allen) याने पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करताना सर्वांची वाहवा मिळवली.
This was a crazy shot from Finn Allen. https://t.co/b5ZeZz4iNa
— Johns. (@CricCrazyJohns) October 22, 2022
मुख्य फेरीच्या या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने सर्वांना धक्का देत अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिल याच्या जागी युवा फिन ऍलनला संधी दिली. त्याने हा निर्णय सार्थ ठरवला. पहिल्या षटकातच त्याने ऑस्ट्रेलियाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला एक षटकार व दोन चौकार ठोकत दमदार सुरुवात करून दिली. दुसऱ्या षटकात जोस हेजलवूड व तिसऱ्या षटकात पॅट कमिन्स यांच्यावर आक्रमण चढवत त्याने संघाला केवळ 3 षटकात 45 धावांची मजल मारून दिली होती. पुढच्या षटकात मार्कस स्टॉयनिस याला षटकार ठोकत संघाला 50 पार नेले.
पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने 16 चेंडूंमध्ये 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. त्याच्या या खेळीने अनेकांना न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलम याची आठवण झाली.
न्यूझीलंडने या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 201 धावांचे आव्हान ठेवले. ऍलननंतर संघाचा दुसरा सलामीवीर डेवॉन कॉनवे याने अखेरपर्यंत नाबाद राहत 92 धावांची खेळी केली. जिमी निशाम याने अखेरीस धडाकेबाज फलंदाजी करताना 13 चेंडूवर 26 धावा चोपल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहितचे स्पष्टीकरण! सांगितले, टीम इंडिया 2021च्या टी20 विश्वचषकापासून कशी चेंज झाली
डेविड वॉर्नर लवकरच होणार निवृत्त! ‘या’ विश्वचषकापर्यंत खेळण्याचा असेल प्रयत्न