गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्याचा परिणाम खेळांवर देखील झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांना परवानगी दिली गेली असली तरीदेखील प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी दिली जात नव्हती. परंतु आता परिस्थिती सावरत असल्यामुळे प्रेक्षकांना देखील मैदानात येऊन सामना पाहण्याची परवानगी दिली जात आहे. अशातच बेसबॉल सामना पाहण्यासाठी देखील चाहत्यांनी खचाखच गर्दी केली होती. त्याचवेळी भर सामन्यादरम्यान थरकाप उडवणारी घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे. काय आहे प्रकार? चला जाणून घेऊया.
अमेरिकेत शनिवारी (१७ जुलै) एक बेसबॉल सामना खेळला गेला. तसं तर बेसबॉल सामना हा ९ डावांचा असतो. या सामन्यातील ६ व्या डावात सामना अगदी रंगतदार स्थितीत पोहोचला होता. प्रेक्षकांचीही उत्सुकता वाढू लागली होती की, कोणता संघ या सामन्यात माजी मारेल? इतक्यात स्टेडियममध्ये धक्कादायक प्रकार घडला, ज्यामुळे सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसह खेळाडू आणि पंचही घाबरले होते.(Firing in live baseball match, watch video)
You can hear the gunshots just as the broadcast cuts away pic.twitter.com/tBmbZaR3GB
— Jack Leonardi (@JackLeonardi) July 18, 2021
खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी संपूर्ण मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमत होता. इतक्यात स्टेडियममध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक उत्साह थांबला आणि प्रेक्षकांचा किंचाळण्याचा आवाज सुरू झाला. मैदानाच्या बाहेर जोरदार गोळीबार सुरू होता. हा आवाज ऐकताच प्रेक्षकांचा थरकाप उडाला होता.
एका महिलेसह दोन दर्शक गंभीर दुखापतग्रस्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात २ लोक गंभीर दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यानंतर आणखी एका महिलेचा उल्लेख करण्यात आला होता, जी सामना सुरू असताना काही कारणास्तव स्टेडियमच्या बाहेर गेली होती. त्यावेळी तिला गोळी लागली होती. आनंदाची बाब म्हणजे ती महिला आता ठीक आहे. तसेच उर्वरित दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात दोन गाड्यांमधून एका आरोपीला अटक केले आहे. तर दुसऱ्याचा शोध घेणे अजूनही सुरू आहे. गोळीबार झाली तेव्हा हा खेळ थांबवण्यात आला होता. त्यावेळी नॅशनल संघ ८- ४ ने पिछाडीवर होता.
https://twitter.com/alexsalvinews/status/1416574135178862601?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1416574135178862601%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fother-sports%2Fgun-shooting-outside-the-stadium-during-washington-nationals-game-fans-told-to-leave-3-people-were-injured-740549.html
https://twitter.com/JustinBeland/status/1416573729014943750?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1416573729014943750%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fother-sports%2Fgun-shooting-outside-the-stadium-during-washington-nationals-game-fans-told-to-leave-3-people-were-injured-740549.html
घाबरलेल्या दर्शकांना दुसऱ्या मार्गे काढण्यात आले बाहेर
पोलिसांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, ही घटना स्टेडियमच्या बाहेर २ गाडी चालकांमध्ये झालेल्या वादातून घडली. त्यामुळे त्यांच्यात जोरदार गोळीबार झाला होता. गोळीबार झाल्यामुळे स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांचा थरकाप उडाला होता. हे सर्व सुरू असताना प्रेक्षकांना स्टेडियमच्या बाहेर जाण्याची अनुमती देण्यात आली नव्हती. त्यांना स्टेडियममध्येच बसून राहण्यास सांगितले होते. परंतु काही वेळानंतर त्यांना स्टेडियमचा दुसरा रस्ता सेंटरफिल्ड आणि राईटफिल्ड गेटमधून बाहेर काढण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आजपासून रंगणार श्रीलंका वि. भारत वनडे मालिका; पाहा कधी, कुठे आणि कसा पाहता येईल सामना?
जेव्हा ‘द वॉल’ची बॅट घेऊन स्म्रीती उतरली होती मैदानात, झळकावले होते झंझावती द्विशतक
श्रीलंकेविरुद्ध ‘हा’ भारतीय धुरंधर ठोकणार द्विशतक! ५ महिन्यांआधीच केली होती अद्वितीय कामगिरी