---Advertisement---

हे काही नवे नव्हे! मुलतान कसोटीआधी इंग्लंड संघाच्या हॉटेलनजीक गोळीबार

On: शुक्रवार, डिसेंबर 9, 2022 9:57 AM
---Advertisement---

सुरक्षेच्या कारणास्तव जवळपास दहा वर्ष पाकिस्तानमध्ये ‌आंतरराष्ट्रीय क्रिकेट‌ होत नव्हते. मागील काही वर्षांपासून त्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. त्याचवेळी आता तब्बल 17 वर्षानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघाने आपल्या नावे केला. मालिकेतील दुसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाचा हॉटेलजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

पाकिस्तान व इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी मुलतान येथे होईल. शुक्रवारपासून (9 डिसेंबर) या कसोटीला सुरुवात होईल. मात्र त्याच्या काही तास आधीच मुलतान येथे गोळीबार झाल्याची घटना घडली. इंग्लंड संघ वास्तव्यास असलेल्या हॉटेलपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हा गोळीबार झाला. मात्र, याचा इंग्लंड संघाला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येते. तसेच, हा दुसरा कसोटी सामना नियोजित वेळेवर सुरू होईल.

पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाला कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे. एखाद्या देशाच्या राष्ट्रपतीला जी सुरक्षा देण्यात येते ती सुरक्षा इंग्लंड संघाला मिळतेय.

मालिकेतील पहिल्या कसोटीबाबत सांगायचे झाल्यास, रावळपिंडी येथील फलंदाजांना पूरक असलेल्या खेळपट्टीवर सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने पाकिस्तानचा पहिला डाव 579 धावांत गुंडाळला होता. तत्पूर्वी, इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात चार फलंदाजांच्या शतकांच्या जोरावर 657 धावा उभारलेल्या. आपल्या दुसऱ्या डावात अतिशय आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडने 264 धावा उभारल्या. त्यामुळे पाकिस्तानसमोर विजयासाठी 343 धावांचे आव्हान ठेवले गेले. अनुभवी जेम्स अँडरसन व युवा ओली रॉबीन्सन यांच्यापुढे पाकिस्तानी फलंदाजीची वाताहात झाली. त्यामुळे पाकिस्तानचा डाव 268 धावांवर संपुष्टात आला. यासह पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव झाला.

(Firing Near England Team Hotel Before Multan Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघाची निवड, या खेळाडूच्या पुनरागमनामुळे भारताची चिंता वाढली
रविंद्र जडेजाची पत्नी विजयाच्या अगदी जवळ, म्हणाली, ‘गुजरातची जनता…’ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---