पाकिस्तानातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू तसेच माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याबद्दलची ही बातमी आहे. इम्रान यांच्यावर गोळीबार झाला. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वजीराबाद येथे जफर अली खान चौकाजवळ त्यांच्या ताफ्याजवळ गोळीबार झाला. असा दावा केला जातोय की, त्यांच्या पायावरही गोळी लागली आहे. त्यामुळे ते जखमीही झाले आहेत.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या कंटेनरवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानातील माध्यमांतील वृत्तानुसार, गोळीबारात इम्रान यांच्यासह जवळपास 9 लोकही जखमी झाले आहेत. माध्यमांनी सांगितले की, अज्ञात हल्लेखोरांनी वजीराबाद येथे अल्लाह हो चौकाजवळ पीटीआय अध्यक्ष इम्रान खान यांच्या कंटनेरवर गोळीबार झाला. मात्र, इम्रान यादरम्यान थोडक्यात बचावले. मात्र, त्यांना दुखापत झाली.
Imran Khan shot in the leg, one PTI worker killed, 9 injured in firing at long march container. pic.twitter.com/lCqiE0UBl8
— Naila Inayat (@nailainayat) November 3, 2022
एका वृत्तानुसार, इम्रान खान जखमी झाले आहेत आणि त्यांच्या पायावर गोळी (Imran Khan leg injured during firing) लागली आहे. त्यांच्या उजव्या पायावर पट्टी बांधल्याचे दिसले आहे. हल्ल्यानंतर कंटेनरवरून उतरवून इम्रान यांना बुलेट प्रूफ कारमधून घेऊन जात रुग्णालयात दाखल केले आहे. (Imran Khan Admitt In Hospital)
पीटीआयचे फारुख हबीब (Farrukh Habib) यांनी गोळीबारात इम्रान हे जखमी झाल्याची पुष्टी केली आहे. इम्रान यांच्या कंटेनरजवळ झालेल्या गोळीबारात पीटीआय नेता फैसल जावेदही जखमी झाले आहेत. तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) या पक्षाच्या विरोधाचा गुरुवारी (दि. 03 नोव्हेंबर) सातवा दिवस होता.
खरं तर, इम्रान खान लाहोर ते इस्लामाबाद पदयात्रा काढत आहेत. या मोर्चादरम्यान ते ज्या कंटेनरमध्ये होते त्या कंटेनरजवळ गोळीबार झाला आहे. या हल्ल्यानंतर इम्रान खान यांना कंटेनरमधून काढून गाडीत बसवण्यात आले. हल्लेखोरांना पकडण्यात आले असले, तरी या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: संजू सॅमसनने केला टेनिस बॉलचा सराव, एकापेक्षा एक शॉट मारताना दिसला पठ्ठ्या
भारतापाठोपाठ धवनच्या खांद्यावर आयपीएलच्या ‘या’ संघाची जबाबदारी, तुम्हीही म्हणाल, ‘गब्बर छा गये तुम’