---Advertisement---

प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा । विजय क्लब, जय भारत क्रीडा, अंकुर स्पोर्टस् उपांत्यपूर्व फेरीत दाखल

On: शुक्रवार, फेब्रुवारी 2, 2024 6:44 PM
File Photo
---Advertisement---

मुंबई:- विजय क्लब, जय भारत क्रीडा, अंकुर स्पोर्टस् यांनी श्री साई क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मफतलाल कंपाऊंड, लोअर परेल येथील स्व. दत्ता गोताड क्रीडांगणावर झालेल्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात विजय क्लबने अटीतटीच्या लढतीत शिवशक्तीचे आव्हान ३८-३२ असे संपुष्टात आणले. विश्रांतीपर्यंतच्या खेळात १६-१८ अशा पिछाडीवर पडलेल्या विजय क्लबने विश्रांतीनंतर आपल्या आक्रमणाची धार वाढवीत ६गुणांच्या फरकाने विजय साकारला. अजिंक्य कापरे, विजय दिवेकर, आयुष साळवी विजय क्लब कडून, तर साई चौगुले, संतोष वारकरी शिवशक्ती मंडळाकडून उत्कृष्ट खेळले.

दुसऱ्या सामन्यात जय भारत क्रीडा मंडळाने यंग विजय मंडळावर ४९-३९ अशी मात केली. आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात २१-११अशी आघाडी घेणाऱ्या जय भारतने उत्तरार्धात संयमी खेळ करीत आपला विजय साकारला. निखिल पाटील, अनिकेत मिटके जय भारत कडून, तर चिराग पाडावे, समीर घोनभरे यंग विजय कडून उत्कृष्ट खेळले. शेवटच्या सामन्यात अंकुर स्पोर्टस् ने पिंपळेश्वर मंडळाला ५०-१५ असे सहज नमवित आगेकूच केली. धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या अंकुरने पहिल्या डावात २७-०७ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात खेळाची गती कायम राखत गुणांचे अर्धशतक गाठले. सुशांत साईल, अभिमन्यू पाटील, सौरभ चौगुले यांच्या चतुरस्त्र खेळाला या मोठ्या विजयाचे श्रेय जाते. पिंपळेश्वरचा प्रतिकार अगदीच दुबळा होता.

महत्वाच्या बातम्या – 
IND vs ENG । जयस्वालच्या शतकानंतर राजस्थान रॉयल्सकडून रोहितला श्रेय! फ्रँचायझीची पोस्ट तुफान व्हायरल
IND vs ENG । द्विशतकाच्या जवळ पोहोचलाय जयस्वाल, पहिल्या दिवसाखेर भारताची 300+ धावांपर्यंत मजल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---