शुक्रवारी (दि. 31 मार्च) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना रंगला. या सामन्यात चेन्नईची सुरुवात खराब झाली. मात्र, पुणेकर ऋतुराज गायकवाड याने एका बाजूने खिंड लढवत संघाला दीडशे धावांचा आकडा पार करून देण्यात मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे, त्याने यादरम्यान अर्धशतक झळकावले. हे स्पर्धेतील पहिले अर्धशतक ठरले. मात्र, ऋतुराजपूर्वी कोणत्या खेळाडूंनी अर्धशतक केले होते, हे आपण जाणून घेऊयात…
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला होता. चेन्नईने या सामन्यात 20 षटकात 7 विकेट्स गमावत 178 धावा केल्या. यावेळी चेन्नईकडून डावाची सुरुवात डेवॉन कॉनवे (Devon Conway) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांनी केली. यावेळी कॉनवे वैयक्तिक 1 धावेवर त्रिफळाचीत बाद झाला. त्याच्यानंतर ऋतुराजने डाव सांभाळत धावफलक हलता ठेवला. यादरम्यान त्याने तडाखेबंद फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले.
ऋतुराजचे वादळी अर्धशतक
ऋतुराजने यादरम्यान अवघ्या 23 चेंडूत 50 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 चौकार आणि 5 षटकारही मारले. त्याच्या सामन्यातील एकूण धावांबाबत बोलायचं झालं, तर त्याने 50 चेंडूत 92 धावा चोपल्या. यामध्ये 4 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता.
First FIFTY of #TATAIPL 2023 goes to @Ruutu1331 😎
He brings his half-century with a MAXIMUM and the #CSK opener is looking in solid touch 🔥
Follow the match ▶️ https://t.co/61QLtsnj3J#GTvCSK pic.twitter.com/il3aTywYSA
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
प्रत्येक हंगामातील पहिले अर्धशतक
ऋतुराजपूर्वी प्रत्येक आयपीएल हंगामात पहिले अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घ्यायचं झालं, तर आयपीएल 2008मधील पहिले अर्धशतक ब्रेंडन मॅक्युलम याने मारले होते. मॅक्युलमनंतर 2009च्या हंगामात पहिले अर्धशतक करण्याची कामगिरी सचिन तेंडुलकर याने केली होती. त्यानंतर 2010च्या हंगामात अँजेलो मॅथ्यूज याने पहिले अर्धशतक केले होते. पुढे आयपीएल 2011मध्ये श्रीकांत अनिरुद्धने स्पर्धेचे पहिले अर्धशतक केले होते. तसेच, 2012च्या हंगामाचे पहिले अर्धशतक करण्याचा मान रिचर्ड लेव्ही या फलंदाजाला मिळाला होता.
यानंतर 2013च्या हंगामातील पहिले अर्धशतक माहेला जयवर्धनेने केले होते. 2014च्या आयपीएलमधील पहिले अर्धशतक मनीष पांडेने केले होते. 2015च्या आयपीएलमधील पहिले अर्धशतक रोहित शर्माने केले होते. त्यानंतर 2016च्या आयपीएलमधील पहिले अर्धशतक करण्याचा मान अजिंक्य रहाणेला मिळाला होता. यानंतर 2017, 2018 आणि 2019 या तीन आयपीएल हंगामातील पहिले अर्धशतक अनुक्रमे मोझेस हेन्रीक्स, ड्वेन ब्रावो आणि डेविड वॉर्नर यांनी केले होते. यानंतर 2020 ते आताच्या 2023 आयपीएल हंगामातील पहिले अर्धशतक करण्याचा मान हा चेन्नईच्या खेळाडूंना मिळाला. त्यात अनुक्रमे 2020मध्ये अंबाती रायुडू, 2021मध्ये सुरेश रैना, 2022मध्ये एमएस धोनी आणि आता 2023मध्ये ऋतुराज गायकवाड यांनी हंगामाचे पहिले अर्धशतक केले. (First fifty in each IPL season know list here)
प्रत्येक आयपीएल हंगामात पहिले अर्धशतक करणारे फलंदाज
2008 – ब्रेंडन मॅक्युलम
2009 – सचिन तेंडुलकर
2010 – अँजेलो मॅथ्यूज
2011 – श्रीकांत अनिरुद्ध
2012 – रिचर्ड लेव्ही
2013 – माहेला जयवर्धने
2014 – मनीष पांडे
2015 – रोहित शर्मा
2016 – अजिंक्य रहाणे
2017 – मोझेस हेन्रीक्स
2018 – ड्वेन ब्रावो
2019 – डेविड वॉर्नर
2020 – अंबाती रायुडू
2021 – सुरेश रैना
2022 – एमएस धोनी
2023 – ऋतुराज गायकवाड*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुणेकर ऋतुराजचा अहमदाबादेत राडा! अवघ्या 23 चेंडूत फिफ्टी ठोकत केला ‘हा’ खास पराक्रम, बातमी वाचाच
विकेट एक, विक्रम अनेक! शमीने कॉनवेच्या दांड्या उडवताच नावावर झाले खास रेकॉर्ड, पाहा व्हिडिओ