बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात संघर्ष करताना दिसत आहे.
इंग्लंडच्या या डावाला शुक्रवारी (3 आॅगस्ट) तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताच्या इशांत शर्मा आणि आर अश्विन या गोलंदाजांनी सुरुंग लावला आहे. त्यांनी मिळून या डावात प्रत्येकी 3 अशा मिळून 6 विकेट्स घेतल्या आहेत.
अश्विनने गुरुवारीच तिसऱ्या सत्रात अॅलिस्टर कूकला शून्यावर बाद करत इंग्लंडची पहिली विकेट घेतली होती. त्याने त्याचा हाच फॉर्म कायम ठेवताना शुक्रवारीही जो रुट(14) आणि केटन जेनिंग्जला(8) बाद करुन इंग्लडला दुसऱ्या डावात सुरुवातीलाच हे दोन धक्के दिले.
त्यानंतर अश्विनबरोबरच इशांतनेही डेव्हिड मलान(20), जॉनी बेअरस्टो(28) आणि बेन स्टोक्स(6) या फलंदाजांना बाद केले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था शुक्रवारी दुसऱ्या डावात 6 बाद 86 धावा अशी झाली आहे.
अश्विनने या सामन्यात आत्तापर्यंत 7 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या होत्या. तर इशांतने पहिल्या डावात 1 तर दुसऱ्या डावात 3 विकेट अशा मिळून 4 विकेट्स घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अश्विनचा जलवा! पुन्हा विकेट्स पुन्हा नवा पराक्रम
–कालच्या शतकापेक्षा त्या सामन्यातील शतक माझ्यासाठी खास- विराट कोहली
–सचिन- विराटबद्दल असा योगयोग तब्बल २२ वर्षांनी घडला