सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 2 ऑगस्ट रोजी खेळला गेला. हा सामना बरोबरीत सुटला. मात्र सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर का घेण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याआधी टी20 मालिकेतील शेवटचा सामनाही बरोबरीत सुटला होता, ज्यानंतर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरनं लागला. मात्र एकदिवसीय सामन्यात सुपर ओव्हर न झाल्यामुळे नवा गदारोळ माजला आहे.
आयसीसीच्या जुन्या नियमांनुसार, एकदिवसीय सामन्यांमध्ये सुपर ओव्हर होत नाहीत. आयसीसीसी स्पर्धांमध्ये सुपर ओव्हर असतात. मात्र आता आयसीसीच्या नवीन नियमानुसार भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात सुपर ओव्हर व्हायला हवी होती. यानंतर प्रश्न उपस्थित होतोय की, या सामन्यात पंच आयसीसीचा नवा नियम विसरले होते का?
आयसीसीच्या नियम 16.3 नुसार, सामन्याचे दोन्ही डाव पूर्ण झाल्यानंतर स्कोअर समान राहिल्यास सुपर ओव्हर खेळली जाईल. यानंतर, सुपर ओव्हर टाय झाल्यास असाधारण परिस्थिती उद्भवल्याशिवाय विजेता घोषित केला जात नाही आणि पुढील सुपर ओव्हर खेळली जाते. विजेता घोषित करण्यासाठी आवश्यक सुपर ओव्हर खेळणं शक्य नसल्यास सामना बरोबरीत राहील. हा नियम आयसीसीनं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आणला होता.
Seems umpires blundered last night at RPS. According to new playing conditions that’ve been in effect since December 2023, a tied ODI should have gone for a super over. In fact there were provision for multiple super overs to break the deadlock. pic.twitter.com/6Jao6n76vk
— Rex Clementine (@RexClementine) August 3, 2024
पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 230 धावा केल्या होत्या. यानंतर टीम इंडियाही 230 रन्सवर ऑलआऊट झाली. मात्र, एकवेळ या सामन्यात भारत सहज जिंकेल असं वाटत होतं. अखेर सामना टाय झाला. यानंतर सर्वांना वाटलं की या सामन्यात सुपर ओव्हर होईल, पण तसं झालं नाही. आता उभय संघांमधला पुढचा सामना 4 ऑगस्टला होणार आहे.
हेही वाचा –
भारतीय क्रिकेटपटूंना लवकरच मिळणार मोठे गिफ्ट, बीसीसीआय सचिव जय शहा यांची घोषणा
टीम इंडियावर ‘गंभीर इफेक्ट’; गोलंदाजी प्रशिक्षकाने स्पष्टच सांगितलं, “सलामीवीरांना भविष्यात….”
भारत विरुद्ध श्रीलंका सामना टाय झाला मग सुपर ओव्हर का नाही? जाणून घ्या आयसीसी नियम