---Advertisement---

दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड : पहिली वनडे पुन्हा रद्द; यावेळी खेळाडू नाही हॉटेल स्टाफला कोरोनाची लागण

On: रविवार, डिसेंबर 6, 2020 3:51 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील रविवारी(6 डिसेंबर) होणारा पहिला वनडे सामना पुन्हा एकदा स्थगित करण्यात आला. यावेळेस खेळाडू नव्हे तर हॉटेलच्या स्टाफमधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात होणार वनडे मालिकेतील पहिला सामना पुन्हा एकदा स्थगित करण्यात आला.

यापूर्वी शुक्रवारी (4 डिसेंबर) हा सामना होणार होता. पण सामन्याच्या काही तास अगोदर दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारपर्यंत स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी (5 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेच्या अन्य खेळाडूंच्या कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. ज्यानंतर इंग्लंड विरुद्ध पहिल्या वनडे मालिकेची सुरू होण्यासाठी मार्ग मोकळा झाला होता.

पण रविवारी पुन्हा इंग्लंड संघ रहात असलेल्या हॉटेल स्टाफमधील 2 जणांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे पुन्हा एकदा हा सामना स्थगित केला गेला.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या या वनडे सामन्याआधी टी20 मालिका झाली आहे. या टी20 मालिकेत इंग्लंडने 3-0 असा विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मायदेशात व्हाईटवॉश दिला आहे. त्यानंतर आता वनडे मालिकेवर सध्या कोरोनाचे सावट आहे. नियोजित वेळापत्रकानुसार या मालिकेतील दुसरा आणि तिसरा वनडे अनुक्रमे ७ आणि ८ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. पण आता हे सामने होणार का यावर प्रश्नचिन्ह आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘बर्थडे बॉय’ श्रेयस अय्यरने टिपला अफलातून झेल, पाहा Video

नेतृत्त्व कसे करावे हे विराटने ‘या’ खेळाडूकडून शिकावे, मोहम्मद कैफची कोहलीवर टीका

विराट ऐवजी रोहित शर्माला टी२० संघाचे कर्णधारपद देण्याची गरज नाही, भारतीय दिग्गजाचे मत

ट्रेंडिंग लेख –

HBD जड्डू! बॅटने तलवारबाजी करणाऱ्या ‘सर जडेजा’च्या ३ उत्कृष्ट खेळी

‘बर्थडे बॉय’ रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?

भारताच्या ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंचा आज आहे वाढदिवस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---