भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात सिडनी येथे खेळला गेलेला तीनदिवसीय सराव सामना अनिर्णीत राहिला. भारतीय संघाने पहिला डाव ९ बाद २४७ वर घोषित केला होता. ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करताना ९ बाद ३०६ अशी धावसंख्या करून ५९ धावांची आघाडी घेतली होती.
दुसर्या डावात भारताने ९ बाद १८९ अशा धावसंख्येवर डाव घोषित करत ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी 131 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ तिसर्या दिवसअखेर १ बाद ५२ धावाच करू शकला. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. भारतीय संघासाठी हा सामना खास नाही ठरला आणि पराभवा पासून थोडक्यात वाचला.
कॅमरन ग्रीनचे नाबाद शतक
दुसर्या दिवसाच्या ८ बाद २८६ धावसंख्येवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलिया अ संघाने ९ बाद ३०६ या धावसंख्येवर डाव घोषित केला आणि ५९ धावांची आघाडी घेतली. यामध्ये कॅमरन ग्रीनने १२५ धावांची जबरदस्त नाबाद खेळी साकारली. भारताकडून उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. दुसर्या डावात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. शुभमन गिल २९ आणि पृथ्वी शाॅने १९ धावा केल्या. त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा भोपळाही न फोडता बाद झाला. मात्र कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी प्रत्येकी २८ धावांची खेळी केली.
परंतु भारताने एक वेळेस आपले ६ गडी फक्त ३९ धावांवर गमावले होते. भारतीय संघाने ३ बाद १०४ अशा धावसंख्येवरून ९ बाद १४३ अशी स्थिती करून घेतली होती. मात्र रिद्धीमान साहाने ५४ धावांची नाबाद खेळी करताना संघाला १८९ धावसंख्येवर पोहचवले आणि भारतीय संघाला पराभवाच्या छायेतून वाचवले. साहाने कार्तिक त्यागी सोबत मिळून ४६ धावांची भागीदारी केली त्यामुळे भारतीय संघाने ९ बाद १८९ धावसंख्येवर आपला डाव घोषित केला.
That's it. That match is drawn with Australia A finishing on 1-52.
SCORECARD: https://t.co/MfBZAvzAkr#AUSAvIND pic.twitter.com/wCUV91oj2Z
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2020
ऑस्ट्रेलियाला गाठायचे होते १३१ धावांचे लक्ष्य
ऑस्ट्रेलिया अ संघाला विजयासाठी १५ षटकांत १३१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु ऑस्ट्रेलिया संघ १ बाद ५२ अशी धावसंख्या करू शकला. त्यामुळे पहिला तीन दिवसीय सराव सामना अनिर्णीत राहिला. या डावात उमेश यादवने एक मात्र विकेट घेतली. त्याने जो बर्न्स याला खातेही उघडू दिले नाही. मार्क्स हैरीसने २५ आणि कर्णधार ट्रेविस हेड ने २ धावांवर नाबाद राहिले.
भारताकडून सर्वात महत्वाचे म्हणजे अजिंक्य रहाणेने या सामन्यातील पहिल्या डावात नाबाद शतक ठोकले. त्याचे फॉर्ममध्ये येणे भारतीय संघासाठी शुभचिन्ह आहे. त्याचबरोबर रिद्धीमान साहाने सुद्धा चांगली कामगिरी केली. उमेश यादवने या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या.
संबंधित बातम्या:
– टीम इंडियासाठी आनंदाची गोष्ट; अजिंक्य रहाणेची ऑस्ट्रेलियाच्या या संघाविरुद्ध शतकी खेळी
– Video: पुजाराविरुद्ध ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची असणार ही रणनिती; पहिल्या सराव सामन्यात अशाप्रकारे केले बाद
– अभिमानास्पद! जखमी खेळाडूची विचारपूस करण्यासाठी रहाणे थेट ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंगरुममध्ये