सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने या दौऱ्यासाठी आपली तयारी सुरू केली. भारतीय संघ दौऱ्याच्या सुरुवातीलाच कसोटी मालिका खेळणार आहे. 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाने दोन सराव सामने खेळण्याचे निश्चित केले. यादरम्यान पहिला सराव सामना पाच जुलै रोजी सुरू झाला. या दोनदिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे प्रमुख फलंदाज मैदानात उतरले. यामध्ये विराट कोहली आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही.
या सराव सामन्यात भारतीय संघातील प्रत्येकी आठ खेळाडूंचे दोन संघ केले गेले. तर, प्रत्येकी तीन स्थानिक खेळाडूंना दोन्ही संघात समाविष्ट करण्यात आले. पहिल्या दिवशी रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल या मुंबईकर जोडीने सलामी दिली. या दोघांनी देखील दमदार अर्धशतके पूर्ण करत शतकी भागीदारी केली. त्यानंतर या दोघांनी देखील रिटायर हर्ट होण्यास निर्णय घेतला.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहली याला मात्र अपयश आले. डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकत याच्या गोलंदाजीवर तो स्लीपमध्ये झेल देत बाद झाला. त्याने केवळ तीन धावा केल्या. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शुबमन गिल हा फलंदाजी करत होता.
भारतीय संघ 9 तारखेला आणखी एक सराव सामना खेळेल. त्यानंतर 12 जुलैपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर हा सामना खेळला जाईल. भारतीय संघ याच मालिकेतून आपल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-2025 सायकलची सुरुवात करेल. यानंतर भारतीय संघ थेट डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळणार आहे.
(First Practice Match Of India In West Indies Rohit Yashasvi Shines Virat Flop)
महत्वाच्या बातम्या –
INDvsWI । जयस्वालपासून ते बिश्नोईपर्यंत; रोहितच्या अनुपस्थितीत ‘यांना’ संधी, प्रमुख दावेदार मात्र बाहेरच
स्मिथ रचणार इतिहास! 100वी कसोटी खेळण्याआधीच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद