पुणे | पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाने महाराष्ट्र क्रिकेट संघटना 1 संघाचा तर व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने पुना क्लब संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत साहिल चुरीच्या अचुक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदु जिमखाना संघाने महाराष्ट्र क्रिकेट संघटना 1 संघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना साहिल चुरी, आदित्य लोंढे , सिध्देश विर व यश माने यांच्या लक्षवेधी गोलंदाजीपुढे महाराष्ट्र क्रिकेट संघटना 1संघ केवळ 35.5 षटकात सर्वबाद 119 धावांत गारद झाला. 119 धावांचे लक्ष अमेय भावे व सिध्देश विर यांनी केलेल्या अफलातून 122 चेंडूत 95 धावांच्या भागीदारीसह पीवायसी हिंदु जिमखाना संघाने केवळ 25.2 षटकात 1 गडी गमावत 120 धावा करून पुर्ण केले. अमेय भावेने नाबाद 64 तर सिध्देश विरने 40 धावा केल्या. 21 धावांत 5 गडी बाद करणारा साहिल चुरी सामनावीर ठरला.
उपांत्य फेरीच्या दुस-या लढतीत अॅलन रोड्रीग्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने पुना क्लब संघाचा 24 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. अतितटीच्या झालेल्या लढतीत शेवटपर्यंत लढा देत व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने विजय संपादन केला. पहिल्यांदा खेळताना सौरभ नवलेच्या अर्धशती खेळीच्या बळावर व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने 38 षटकात सर्वबाद 161धावा केल्या. अलान रोड्रीग्सने नाबाद 30 धावा करून सौरभला सुरेख साथ दिली. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चंद्रकांत सरोजच्या 51 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत व अलान रोड्रीग्स, साईगणेश जीदाप व ओम भोसले यांच्या अचूक गोलंदाजीपुढे पुना क्लब संघाचा डाव केवळ 42.1 षटकात सर्वबाद 137 धावांत गारद झाला. नाबाद 30 धावा व 18 धावात 3 बळी घेणार अॅलन रोड्रीग्स सामनावीर ठरला.
महत्वाच्या बातम्या –
–जडेजाच्या नावावर नकोसा विक्रम, यापुर्वीही केलायं असा कारनामा
–मला त्या विषयावर बोलायचं नाही- एमएस धोनी
–एशिया कप 2018: रोमहर्षक झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने टीम इंडियाला बरोबरीत रोखले!
–टाॅप ४- धोनीसह या खेळाडूंनी खेळले आहेत सर्वाधिक टाय वन-डे सामने