इंडियन प्रीमियर लीग २०१२२ (आयपीएल २०२२) मधील सहावा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (KKRvRCB) यांच्या दरम्यान खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने घेतला. गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरवत कोलकाताचा डाव १२८ धावांवर संपुष्टात आणला. प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर कोलकाताचे दहाव्या व अकराव्या क्रमांकावरीर फलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) व वरूनचक्रवर्ती (Varun Chakravarty) यांनी छोटेखानी खेळी करत नव्या आयपीएल विक्रमाला गवसणी घातली.
उमेश-वरूनचा कारनामा
चेन्नई सुपर किंग्सला पहिल्या सामन्यात पराभूत केल्यानंतर केकेआर संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरला. मात्र, आरसीबीच्या गोलंदाजांनी त्यांची पुरती वाताहत केली. प्रमुख फलंदाज आणि अष्टपैलू असे तब्बल ८ खेळाडू केकेआरने आपल्या संघात खेळवले होते. मात्र, आरसीबीच्या भेदक गोलंदाजी पुढे या सर्वांना अपयश आले. अष्टपैलू आंद्रे रसेल याने सर्वाधिक २५ धावा केल्या. केकेआरने आपले नऊ बळी १०१ धावांवर गमावलेले.
केकेआरला लवकरात लवकर सर्वबाद करण्याचा प्रयत्न आरसीबीच्या गोलंदाजांनी केला. मात्र, केकेआरचे अखेरचे फलंदाज उमेश यादव व वरून चक्रवर्ती यांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. दोघांनी अखेरच्या गड्यासाठी २७ धावांची छोटी मात्र महत्त्वपूर्ण भागीदारी केली. उमेशने दोन चौकार व एका षटकाराच्या मदतीने १२ चेंडूमध्ये १८ धावा केल्या. तर, चक्रवर्तीने १६ चेंडूंमध्ये नाबाद १० धावांचे योगदान दिले. आयपीएल इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा, दहाव्या आणि अकराव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली आहे.
बेंगलोरची शिस्तबद्ध गोलंदाजी
पंजाब विरुद्ध पहिला सामन्यात २०६ धावांचा बचाव करू न शकलेल्या आरसीबीच्या गोलंदाजांनी या सामन्यात शिस्तबद्ध गोलंदाजी केली. वानिंदु हसरंगा याने सर्वाधिक चार बळी घेत कोलकाता डाव आटोपण्यात सिंहाचा वाटा उचलला. युवा आकाश दीपने तीन तर, हर्षल पटेलने दोन बळी मिळवले. मोहम्मद सिराजला एक बळी मिळाला.
(First Time Both Tenth And Eleventh Number Batters Scored In Double Digits In An IPL Innings)
अधिक वाचा
‘मॅन इन फॉर्म’ पर्पल पटेलचा नवा आयपीएल रेकॉर्ड! केकेआरचे कंबरडे मोडत केली करामत
आयपीएल गाजवणारा श्रीलंकन म्हणतोय, “विराट क्रिकेटचा रोनाल्डो! मी त्याच्याकडून ट्रेनिंग घेणार”






