---Advertisement---

VIDEO: विलीच्या ‘टॉप क्लास’ कॅचने राणाला धरावी लागली पव्हेलियनची‌ वाट; तुम्हीही पाहा

On: बुधवार, मार्च 30, 2022 9:11 PM
willey catch
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०१२२ (आयपीएल २०२२) मधील सहावा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (KKRvRCB) यांच्या दरम्यान खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने घेतला. गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय सार्थ ठरवत कोलकाताचा डाव १२८ धावांवर गुंडाळला. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांनी उत्कृष्ट साथ दिली. बेंगलोरचा अष्टपैलू डेव्हिड विली (David Willey) याने नितीश राणा याचा एक अप्रतिम झेल टिपला.

विलिचा लाजवाब झेल

प्रथम फलंदाजी करत असताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. अवघ्या ५ षटकात त्यांनी आपले दोन्ही सलामीवीर गमावले. ‌‌सहावे षटक टाकण्यासाठी आलेल्या युवा आकाश दीप याने पाचव्या चेंडूवर नितीश राणाला फसवले. त्याने मारलेला अचूक बाऊंसर राणाला खेळता आला नाही. षटकार मारण्याचा नादात चेंडूवर उडाला. त्यावेळी फाईन‌ लेगला उभ्या असलेल्या विलीने ३० यार्ड सर्कल पर्यंत धावत येत, सूर मारून एक लाजवाब झेल पकडला. असाच काहीसा झेल चौथ्या सामन्यात शुबमन गिलने पकडलेला.

 

कोलकाताची खराब फलंदाजी

फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर कोलकाता संग पहिल्यापासून अडचणीत सापडला. सलामीवीर व्यंकटेश अय्यर व‌ अजिंक्य रहाणे हे अनुक्रमे १० व‌ ९ धावा काढून बाद झाले. कर्णधार श्रेयस अय्यर १३ तर राणा १० धावा करू शकला. त्यानंतर सॅम बिलिंग्स आणि सुनील नरीन हे देखील मोठी खेळी करू शकले नाही. अष्टपैलू आंद्रे रसेल याने सर्वाधिक २५ धावांचे योगदान दिले. बेंगलोरसाठी सर्वच गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी बजावली. बेंगलोरसाठी ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ वनिंदू हसरंगाने सर्वाधिक चार बळी मिळवले.‌ युवा आकाश दीपच्या खात्यात ३ तर, हर्षल पटेलच्या खात्यात २ बळी गेले.‌ मोहम्मद सिराजला एक बळी मिळाला.

महत्वाच्या बातम्या-

वडिलांना न्याय दिल्यानंतर राहुल मंकड यांनी घेतला अखेरचा श्वास; भारतीय क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली (mahasports.in)

ख्रीस गेलच्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढच्या IPL हंगामात गेल करणार पुनरागमन? वाचा काय आहे गुड न्यूज (mahasports.in)

VIDEO | खरंच केन विलियम्सन आऊट होता की नाही..? तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे चाहते नाराज (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---