आशिया चषकातील दुसरा सामना भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. भारतीय संघाने पाकिस्तानचा 5 गड्यांनी पराभव करत आपल्या अभियानाची सुरुवात विजयी यांनी केली. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्यासाठी हा सामना खास होता. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 100 सामने खेळणारा तो पहिला भारतीय बनला. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यात त्याच्याबाबत एक नकोशी घटना घडली.
भारतीय संघाने या सामन्यात 148 धावांचा यशस्वी पाठलाग केला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या विराटने संघाची गरज ओळखत एक संयमी मात्र महत्त्वपूर्ण खेळी केली. कर्णधार रोहित शर्मासह दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी करताना त्याने 34 चेंडूवर 3 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या. मात्र, या खेळीनंतरही त्याच्या टी20 सरासरीत घसरण झाली.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोहलीची आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सरासरी 50.12 होती. परंतु, पाकिस्तानविरुद्ध 35 धावा केल्यानंतरही कोहलीची क्रिकेटच्या सर्वात लहान प्रकारामध्ये सरासरी 49.89 वर आली आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 49.53 इतकी झालीये. आता केवळ वनडे क्रिकेटमध्ये कोहलीची सरासरी 50 पेक्षा जास्त म्हणजे 57.68 आहे.
विराट कोहलीला रन मशीन या नावानेही ओळखले जाते. गेल्या दशकात त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत अनेक मोठे विक्रम केले होते. त्यामुळेच त्याची सरासरी प्रत्येक प्रकारामध्ये 50 च्या पुढे होती. मात्र, विराट गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममधून जातोय. प्रत्येक मालिकेत एकदा 1-2 शतके झळकावणारा विराट नोव्हेंबर 2019 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचा 100 धावांचा टप्पा गाठू शकला नव्हता. 2022 मध्ये कोहलीला फक्त एकदाच 50 धावांचा टप्पा पार करता आला आहे. त्यामुळे आता कोहलीची फलंदाजी सरासरीही सातत्याने घसरत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने साध्य केलेल्या शिखराचे माजी दिग्गजाकडून कौतुक! म्हणाला, ‘तुला आणखी खेळताना…’
तयार रहा! रविवारी पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक थरार? अशी आहेत समीकरणे
हार्दिकच्या ‘कडक’ कामगिरीनंतर आनंदला माजी भारतीय क्रिकेटर; ट्विट करत म्हणाला…