भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा पहाड उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र, त्याचवेळी भारतीय फलंदाजांनी मिळून एक नवा विक्रम देखील आपल्याला नावे केला.
पहिले दोन दिवस फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत 480 धावा केल्या. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी देखील तसाच खेळ दाखवला. आपल्या पहिल्या डावात भारतीय संघाच्या पहिल्या सहा विकेटसाठी प्रत्येक वेळी कमीत कमी अर्धशतकी भागीदारी झाली. कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी सलामीसाठी 74 धावा जोडल्या. गिल व पुजाराने दुसऱ्या गड्यासाठी 113, गिल-कोहलीने तिसऱ्या गड्यासाठी 58, चौथ्या विकेटसाठी विराट व जडेजाने 64, पाचव्या विकेटसाठी विराट व भरतने 84 व त्यानंतर सहाव्या गड्यासाठी विराट व अक्षरने 162 धावांची भागीदारी केली.
भारतीय संघाने आपल्या कसोटी इतिहासात प्रथमच ही कामगिरी केली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील कोणत्याही संघाने केलेली पहिलीच अशी कामगिरी ठरली.
भारतीय संघाची या गावातील कामगिरी पाहिल्यास सलामीवीर शुबमन गिल व विराट कोहली हे भारतीय संघाचे नायक ठरले. गिलने आपल्या कारकीर्दीतील दुसरे कसोटी शतक झळकावत 128 धावांची खेळी केली. त्यानंतर विराटने तीन वर्ष आणि तीन महिन्यांचा आपला कसोटी शतकांचा दुष्काळ संपवत 28 वे कसोटी शतक पूर्ण केले. त्याने 186 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 91 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली.
(First time in history India have registered 50+ partnership for each of the first 6 wickets In Ahmedabad Test Happened for the first time in history against Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: शमीला पाहून चाहत्यांनी दिला ‘जय श्रीराम’चा नारा! पाहा पुढे काय घडले
पहिल्या 50 शतकांपेक्षा शेवटच्या 25 शतकांसाठी निघाला विराटचा घाम, आकडेवारीतून दिसतात परिश्रम






