इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात आयपीएलच्या इतिहासात याआधी कधीही न घडलेली बाब पाहायला मिळाली.
या सामन्यात नाणेफेक जिंकत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि अनुभवी शिखर धवन सलामीला आले. डावाचे पहिलेच षटक मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट फेकायला आला. मार्कस स्टॉइनिस खेळपट्टीवर फलंदाजी करत होता. बोल्टने टाकलेला पहिलाच चेंडू बाउन्स होऊन स्विंग झाला. स्टॉइनिसने फटका मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटला लागून थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि पहिल्याच चेंडूवर स्टोइनिस बाद झाला.
आयपीएलच्या इतिहासात अंतिम सामन्यात पहिल्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर याआधी कोणताच फलंदाज बाद झाला नव्हता. त्यामुळे या सामन्यात डावाच्या पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद झाल्यामुळे इतिहासाच घडला.