आयर्लंडचा क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्याची सुरुवात बांगलादेश विरुद्ध आयर्लंड संघातील वनडे मालिकेने झाली. यातील पहिले दोन सामने पार पडले. यातील पहिला सामना बांगलादेशने जिंकला, तर दुसरा सामना पावसामुळे अनिर्णित ठरला. मालिकेतील तिसरा सामना सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात बांगलादेशने 10 विकेट्सने विजय मिळवला. यासोबतच यजमान संघाने मालिका 2-0ने खिशात घातली. या विजयासोबतच बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच खतरनाक विक्रम आपल्या नावावर केला.
झाले असे की, आयर्लंड संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांचा निर्णय बांगलादेश संघाच्या खेळाडूंनी सपशेल चुकीचा ठरवला. यावेळी आयर्लंड संघाचा डाव 28.1 षटकात 101 धावांवरच संपुष्टात आला. हे आव्हान बांगलादेश संघाने 13.1 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले.
A thumping win for Bangladesh as they wrap up a 2-0 series victory 💪#BANvIRE | https://t.co/VEzpOQWvN9 pic.twitter.com/lI3qRe8DJE
— ICC (@ICC) March 23, 2023
बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी रचला इतिहास
आयर्लंडच्या डावादरम्यान ज्या 10 विकेट्स पडल्या, त्या सर्वच्या सर्व विकेट्स बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. बांगलादेशच्या वनडे क्रिकेट इतिहासात एका सामन्यातील विरोधी संघाच्या सर्व 10 विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेण्याचा विक्रम रचला गेला. ही कामगिरी बांगलादेशच्या हसन महमूद, तस्कीन अहमद आणि इबादत हुसेन यांनी करून दाखवली.
बांगलादेशच्या गोलंदाजांचा धमाका
आयर्लंड संघाच्या सर्वाधिक विकेट्स या बांगलादेशचा गोलंदाज हसन महमूद (Hasan Mahmud) याने घेतल्या. त्याने 8.1 षटकात 32 धावा खर्च करत 5 विकटे्स नावावर केल्या. त्याच्यानंतर तस्कीन अहमद (Taskin Ahmed) याने 10 षटकात 26 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. तसेच, इबादत हुसेन (Ebadot Hossain) याने 6 षटकात 29 धावा खर्च करत 2 विकेट्स खिशात घातल्या.
बांगलादेशचा मालिका विजय
आयर्लंडच्या 102 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशकडून लिटन दास (Litton Das) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 38 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. यामध्ये 10 चौकारांचा समावेश होता. तसेच, कर्णधार तमीम इकबाल (Tamim Iqbal) याने 41 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. यासह बांगलादेशने 102 धावा केल्या आणि 10 विकेट्सने विजय मिळवला.
बांगलादेश विरुद्ध आयर्लंड (Bangladesh vs Ireland) संघातील टी20 मालिकेला सोमवारपासून (दि. 27 मार्च) सुरुवात होणार आहे. पहिला सामना चट्टोग्रामच्या मैदानावर खेळला जाणार आहे. (first time in the history of Bangladesh ODI Cricket the pacers have taken all Ten wickets in a match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
किती आले किती गेले! टीम इंडियाला 4 वर्षापासून सतावतोय 4 नंबरचा प्रश्न, चाचपले इतके पर्याय
राष्ट्रकर्तव्य प्रथम! आयपीएलआधी धोनीने निभावली देशसेवेची जबाबदारी, आर्मी कॅम्पमध्ये लावली हजेरी