भारत विरुद्ध विंडीज पहिला टी-20 सामना उद्या (4 नोव्हेंबर) कोलकातामध्ये रंगणार आहे. इडन गार्डनवर होणाऱ्या या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरूवात होणार आहे.
विंडीज विरुद्ध भारताने पाच वन-डे सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकल्यावर आता भारत 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी तयार आहे. यासाठी कालच (3 नोव्हेंबर) भारताचा संघ घोषित करण्यात आला. यामध्ये कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे.
यावेळी यष्टीरक्षणात उत्तम कामगिरी करणाऱ्या एमएस धोनीला मात्र वगळले आहे. म्हणून पहिल्यांदाच भारतीय संघ घरच्या मैदानावर धोनीशिवाय खेळणार आहे. भारताने आतापर्यंत 31 टी-20 सामने भारतात खेळले आहे. या सगळ्या सामन्यांध्ये धोनीचा सहभाग होता.
टीम इंडियाने आजपर्यंत १०४ टी२० सामने खेळले आहेत. त्यात धोनी ९३ सामने खेळला आहे.
सध्या धोनीच्या फलंदाजीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. त्याने 2018मध्ये 20 वन-डे सामन्यात 25च्या सरासरीने 275 धावा केल्या. तसेच सर्वात यशस्वी कर्णधार असणाऱ्या धोनीला विंडीज विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात भारताकडून 10000 धावा पूर्ण करण्याची शेवटची संधी होती. मात्र त्याला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी न मिळाल्याने त्याच्याकडून हा पराक्रम करण्याचा थोडक्यात राहिला. आतापर्यत धोनीने वनडेत भारताकडून 9999 धावा केल्या आहेत.
भारतीय संघ यावर्षी मायदेशात आता केवळ 3 टी-20 सामने खेळणार आहे. हे सामने विंडीजविरुद्ध कोलकाता (4 नोव्हेंबर), लखनऊ(6 नोव्हेंबर) आणि चेन्नई ( 11 नोव्हेंबर) येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडियासोबतचे ते प्रकरण सायमंड्सला चांगलेच भोवले…झाला व्यसनी
–रणजी ट्राॅफी सामन्यात मुंबईकर खेळाडूंनी केली मास्क घालून फलंदाजी