India vs Afghanistan 2nd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना 6 विकेट्स राखून जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. मात्र, या सामन्यात भारताच्या विजयापेक्षा विराट कोहली याच्या एका चाहत्याचीच चर्चा होत आहे. चला तर त्याबद्दल सविस्तर पाहू.
खरंतर इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 मध्ये विराट कोहली सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या एका चाहत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान कोहलीच्या एका चाहत्याने सुरक्षा व्यवस्थेला बगल देत मैदानात प्रवेश केला. या चाहत्याने आधी कोहलीच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर त्याला मिठी मारली. मात्र, सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला तातडीने पकडून मैदानाबाहेर काढले. (first touched virat kohli feet and hugged him indore police arrested fan who entered field ind vs afg 2nd t20)
Virat Kohli as an idol is a happy pill for so many fans#INDvsAFG #INDvAFG #AFGvIND #ViratKohli pic.twitter.com/Kc3LmLX3IZ
— AP (@AksP009) January 14, 2024
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेकवेळा घडले आहे, जेव्हा चाहत्यांनी आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला सामन्यादरम्यान सुरक्षेचा भंग करून त्याला मिठी मारली किंवा त्याच्या पायाला स्पर्श केला. भारत-अफगाणिस्तान दुसऱ्या टी-20 सामन्यादरम्यानही होळकर स्टेडियमच्या मैदानात क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराट कोहलीजवळ एका तरुणाने जाऊन त्याला मिठी मारली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोहलीच्या या चाहत्याला मैदानातून ताब्यात घेऊन तुकोगंज पोलीस ठाण्यात नेण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, “युवकाकडे सामन्याचे तिकीट असून तो नरेंद्र हिरवाणी गेटमधून होळकर स्टेडियममध्ये दाखल झाला होता. त्याने सांगितले की, हा तरुण कोहलीचा मोठा चाहता आहे आणि तो कोहलीला भेटण्याच्या इच्छेने प्रेक्षक गॅलरीच्या कुंपणावर चढून मैदानात प्रवेश केला होता. तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत असून चौकशीच्या आधारे याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.”
हेही वाचा
अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच रोहितने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू
“पुजारा-रहाणेची कसोटी कारकीर्द संपली”, दिग्गज फलंदाजांबाबत माजी खेळाडूचं मोठं विधान