---Advertisement---

IPL 2024 मध्ये खेळणार पहिला आदिवासी खेळाडू, अन् वडिल पाहत आहेत त्या क्षणाची वाट

---Advertisement---

यंदाच्या आयपीएल लिलावात अनेक खेळांडूवर विक्रमी बोली लागत असताना काही भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर कोट्यवधीची उधळण झाली आहे. हे अनकॅप्ड खेळाडू आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. अशांपैकीच एक आहे, झारखंडमधील रांचीचा ख्रिस गेल रॉबिन मिंझला गुजरात टायटन्स संघाने ३ कोटी ६० लाख रुपये खर्च करून रॉबिनला त्यांच्या संघात घेतले होते.

याबरोबरच, पहिला आदिवासी क्रिकेटर रॉबिन मिन्झ आयपीएल 2024 मध्ये खेळताना पहायला मिळणार आहे. तसेच रॉबिन मिन्झचे वडील फ्रान्सिस झेवियर मिन्झ हे रांची विमानतळावर सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहत असतात. तर रॉबिन मिन्झच्या वडिलांचे स्वप्न आहे की त्यांचा मुलगा भारतीय संघाचा एक भाग म्हणून विमानतळाच्या दरवाजातून जाताना पहायचे आहे. तसेच रॉबिन मिंजला IPL 2024 च्या लिलावात गुजरात टायटन्सने विकत घेतले होते. यामुळे आता रॉबिन आयपीएलमध्ये खेळणारा पहिला आदिवासी क्रिकेटपटू ठरणार आहे.

त्यामुळे आता प्रत्येकाला त्याच्या कुटुंबासह रॉबिनला आयपीएल 2024 मध्ये खेळताना पाहायचे आहे. रॉबिनचे वडील फ्रान्सिस झेवियर मिन्झ अजूनही डाउन टू अर्थ आहेत आणि रांची विमानतळावर सुरक्षा रक्षक म्हणून त्यांचे काम पूर्ण प्रामाणिकपणे करतात. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रॉबिनच्या वडिलांचे असे मत आहे की, जोपर्यंत मी निरोगी आहे तोपर्यंत काम करण्यावर माझा विश्वास आहे. रांची विमानतळावर, फ्रान्सिस झेवियर प्रवाशांचे आयडी तपासतो आणि विमानतळाची सुरक्षा ते सुनिश्चित करत असतात.

तसेच रॉबिन मिन्झच्या वडिलांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले आहे की, त्याला लहानपणी खेळण्याची खूप आवड होती आणि हॉकी आणि फुटबॉलसारखे खेळ तो खेळत होता. यादरम्यान त्याला स्पोर्ट्स अकादमीकडून फोनही आला पण त्यावेळी पैशांची कमतरता असल्याने तो पुढे खेळू शकला नाही. आता फ्रान्सिस झेवियरला त्याचा मुलगा रॉबिन मिन्झचे स्वप्न पूर्ण झालेले पहायचे आहे आणि त्याला त्याच्या मुलाच्या स्वप्नात एक नवीन सुरवात होताना पहायची आहे.

दरम्यान, आयपीएल 2024 च्या लिलावात कोणत्याही संघाने रॉबिनला खरेदी करण्यात रस दाखवला नाही, तर नंतर महेंद्रसिंग धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्ज नक्कीच रॉबिनची निवड करेल. एमएस धोनी हा रॉबिन मिन्झचा आदर्श आहे आणि रॉबिनने धोनीला लहानपणापासून खेळताना पाहिले आहे आणि त्याच्याकडून तो बरेच काही शिकला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---