मुंबई शहर मौर्य मेवरीक्स विरुद्ध नांदेड चांबल चॅलेंजर्स यांच्यात प्रमोशन फेरीत तिसऱ्या दिवशी लढत झाली. मुंबई शहर संघाने दोन सामने जिंकले होते तर नांदेड संघाला दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. सामन्याची सुरुवात अतीशय शांतपणे झाली. नांदेड संघाच्या चढाईपटूंना त्यांच्या बचावफळीची उत्तम साथ मिळाल्या मुळे त्यानी मुंबई शहराला ऑल आऊट करत आघाडी मिळवली.
सामन्याच्या मध्यंतरापर्यत मुंबई शहर 13-18 अश्या पिछाडीवर होती यांचे मुख्य कारण होते ते म्हणजे बचावफळी. मुंबईच्या बचावफळीला मध्यांतरापर्यत एकही गुण मिळवता आला नव्हता. तर नांदेडच्या बचावफळीने 5 गुण कमावले होते. मध्यंतरानंतर ही नांदेड संघाकडून आक्रमक खेळ बघायला मिळाला. पहिल्या दोन सामन्यात शांत असलेला अजित चव्हाणने आज आक्रमक खेळ करत सुपर टेन पूर्ण केला.
नांदेड संघाने 51-26 असा सामना जिंकत प्रमोशन फेरीत विजयाचा खात उघडला. मुंबई शहर संघाच्या बचावफळी ने संपूर्ण सामन्यांत केवळ 1 गुण मिळवला. नांदेड कडून अजित चव्हाण ने चढाईत 20 गुण मिळवले तर अक्षय सूर्यवंशी ने 8 गुण मिळवले. पकडीत अभिषेक बोरुडे ने 6 पकडी केल्या. याकूब पाठण व सुरज पाटील ने प्रत्येकी 3 पकडी केल्या. मुंबई शहर कडून शार्दूल पाटील ने सुपर टेन पूर्ण केला. (First win for Nanded Chambal Challengers team in promotion round)
बेस्ट रेडर- अजित चव्हाण, नांदेड चांबल चॅलेंजर्स
बेस्ट डिफेंडर- अभिषेक बोरुडे, नांदेड चांबल चॅलेंजर्स
कबड्डी का कमाल- अजित चव्हाण, नांदेड चांबल चॅलेंजर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video : विरोधी संघात असणाऱ्या आपल्या भावाला हार्दिककडून कडकडून मिठी, जर्सीही केली अदलाबदल
W W W W : कोच नेहराचा संदेश अन् श्वास रोखायला भाग पाडणारी लास्ट ओव्हर, मोहितकडून लखनऊची फलंदाजी उद्ध्वस्त